LPG ला पर्याय असेललं PNG कनेक्शन कसं घ्यायचं?

संतोष कानडे

गॅसचा तुटवडा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात किचनमधील गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरवर मर्यादा आहेत तर घरगुती गॅससाठी पॅनिक बुकिंग सुरुय.

एलपीजी

एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजी गॅस कनेक्शन घ्या, असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

पीएनजी

पीएनजी म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅस. हा पर्याय सिलिंडरपेक्षा स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर मानला जातो.

कनेक्शन

पण पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी तुमच्या शहरात, सोसायटीमध्ये कोणती कंपनी पीएनजी पुरवठा करते, याची चौकशी करा.

महानगरी

मुंबईत महानगरी गॅस, पुणे आणि नाशिकमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस, दिल्लीत इद्रप्रस्थ गॅस, गुजरात गॅस अशा कंपन्या पीएनजी पुरवठा करतात.

ऑनलाईन

कनेक्शन घेण्यासाठी दोन प्रकारे नोंदणी करावी. एक ऑनलाईन पद्धतीने. यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जावं.

New Connection

वेबसाईटवर New Connection किंवा Apply Online असे पर्याय निवडावेत. त्यात पत्ता, मोबाईल नंबर आणि आवश्यक माहिती भरवी.

ऑफलाईन

दुसरी ऑफलाईन पद्धत आहे. यात तुमच्या जवळ असलेल्या कंपनीच्या ग्राहक केंद्राला भेट देऊन नोंदणी फॉर्म भरता येतो.

सर्व्हे

कनेक्शन घेण्यासाठी नोंदणी शुल्क ५००० ते ७००० रुपयांच्या जवळपास असेल. त्यानंतर कंपनीचा प्रतिनिधी तुमच्या घराचा सर्व्हे करेन.

एलपीजी

हा गॅस एलपीजीपेक्षा २०-३० टक्के स्वस्त पडतो. वजनाने हवेपेक्षा हलका असल्याने गळती झाली तर लगेचच हवेत विरघळतो.

इराणध्ये हिंदुंची अवस्था कशी आहे?

<strong>येथे क्लिक करा</strong>