Apurva Kulkarni
छावा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या चित्रपटाची अतुरतेने वाट पाहत आहेत.
'छावा' सिनेमाचा भव्यदिव्य म्यूझिक लॉन्च सोहळा पार पडणार आहे.
तुम्हीही या म्यूझिक लॉन्च सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकतात.
'छावा'ची निर्मिती केलेल्या मॅडॉक फिल्मने इन्स्टाग्राम पेजवर खास घोषणा केली आहे.
ए. आर. रहमान यांच्या उपस्थितीत छावाचा भव्यदिव्य म्यूझिक लॉन्च सोहळा पार पडणार आहे.
यासाठी तुम्हाला मॅडॉक फिल्मच्या इन्स्टाग्राम पेजवरील बायोमध्ये जाऊन लिंकमधील फॉर्म भरावा लागेल.
त्या फॉर्ममध्ये डिटेल्स भरल्यानंतर सिनेमाची टीम तुमच्याशी संपर्क करेल, आणि लॉन्चबद्दल माहिती देईल.
त्यामुळे तुम्हाला जर या म्यूझिक लॉन्च सोहळ्यात सहभागी व्हायचं असेल तर सोनी म्युझिक इंडियाच्या इंस्टाग्राम पेजला भेट द्या.