Anushka Tapshalkar
कोरडे, निस्तेज आणि गळणारे केस सुधारण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स न वापरता स्वयंपाकघरातील डाळिंब वापरून केसांची नैसर्गिक काळजी घेता येते.
डाळिंबाच्या बियांचे तेल ओमेगा-५ आणि पनिसिक अॅसिडने भरलेले असते. डोक्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते व केस गळती कमी होते.
डाळिंबाचे दाणे, दही आणि मध एकत्र करून मास्क तयार करा. केसांना लावून ३० मिनिटे ठेवा. कोरड्या केसांसाठी हा एक प्रभावी उपाय आहे. केस मऊ, चमकदार आणि फ्रिझफ्री होतील.
डाळिंबाचा रस आणि पाणी समप्रमाणात मिसळून केस धुतल्यानंतर शेवटी रिन्स करा. हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतं.
ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होणारी केसगळती डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्समुळे कमी होते. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हे घ्यावेत.
डाळिंबाच्या साली वाळवून पूड करा. ऑलिव्ह तेलात मिसळून हलक्या हाताने डोक्याला स्क्रब करा. मृत त्वचा काढून केसांच्या मुळांना बळकटी मिळते.
पॅराबेन व सल्फेट फ्री अशा डाळिंब घातलेले प्रॉडक्ट्स वापरल्यास केस मजबूत आणि हायड्रेटेड राहतात.
धुतलेल्या केसांच्या टोकांना थोडं डाळिंबाचे सिरम लावा. हे टोकांना संरक्षण देतं व फ्रिझ नियंत्रित करतं.