Aarti Badade
एक प्रभावी बॉस होण्यासाठी केवळ पद असून चालत नाही, तर वेळेचे व्यवस्थापन, शिस्त आणि योग्य नियोजनाची जोड आवश्यक असते. आचार्य चाणक्यांनी यासाठी काही अमूल्य मंत्र दिले आहेत.
Chanakya Niti for successful boss
Sakal
चाणक्यांनुसार, कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होण्यापूर्वी त्याची चर्चा इतरांशी करू नका. तुमची रणनीती योग्य वेळ येईपर्यंत गुपित ठेवल्यास प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकत नाहीत.
Chanakya Niti for successful boss
Sakal
यशस्वी बॉस खूप मवाळ नसावा. जिथे कामाचा प्रश्न येतो तिथे कठोर व्हा आणि जिथे शक्य असेल तिथे सौम्यता दाखवा. शिस्त पाळल्यानेच टीमकडून अपेक्षित परिणाम मिळतात.
Chanakya Niti for successful boss
Sakal
जर तुम्हाला तुमची टीम मेहनती हवी असेल, तर आधी स्वतः मेहनत करून दाखवा. तुमच्या शब्दांत आणि कृतीमध्ये फरक नसावा. एक चांगला बॉस स्वतःच्या कृतीने टीमला प्रेरित करतो.
Chanakya Niti for successful boss
Sakal
बॉसचे यश त्याच्या टीमवर अवलंबून असते. लोकांची निवड करताना केवळ वशिल्यावर नाही, तर त्यांच्या कौशल्यांवर आणि सचोटीवर आधारित करा. योग्य माणसे जोडा.
Chanakya Niti for successful boss
Sakal
खरा नेता संकटाच्या वेळीच ओळखला जातो. एखादा प्रोजेक्ट अयशस्वी झाल्यास घाबरून जाण्याऐवजी शांत राहून उपाय शोधा. संयमी व्यक्तीच मोठ्या अडथळ्यांवर मात करू शकते.
Chanakya Niti for successful boss
Sakal
एक चांगला व्यावसायिक होण्यासाठी चिकाटी आणि नैतिक मूल्ये जपणे आवश्यक आहे. जिद्द आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेवतो.
Chanakya Niti for successful boss
Sakal
Heart attack night symptoms
sakal