सकाळ डिजिटल टीम
मका, गहू,सोयाबीन आणि बेसनापासून बनवलेल्या चपाती थकवा दूर करण्यास मदत करतात. हे पदार्थ प्रथिनांच्या कमतरतेला भरून काढतात आणि शरीर बळकट करतात.
शारीरिक ताकद वाढवण्यासाठी प्रथिनं, फळं, भाज्या, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
व्यायामाने शरीर बळकट करण्यास मदत मिळते. नियमित शारीरिक सक्रियता, विशेषतः हलके व्यायाम आणि चालणे, शारीरिक ताकद वाढवण्यास मदत करतात.
थकवा येण्याचे मुख्य कारणे ताणतणाव असू शकतात. मानसिक शांतता आणि योग्य विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुळशीचे बी आणि साखरेची पावडर शरीराच्या कमजोरीवर प्रभावी काम करते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा पावडर दुधासोबत घेतल्याने शरीराची ताकद वाढते.
पिंपळाच्या फळाची पावडर शारीरिक कमजोरीसाठी फायदेशीर ठरते. खडीसाखर सोबत रोज एक चमचा खाणे शरीराला ऊर्जा मिळवून देतात.
रात्री ४०-५० मनुके आणि ८-१० बदाम भिजवून सकाळी दुधासोबत एकत्र स्मूदी बनवून प्या. यामुळे शरीर बळकट होते आणि कमजोरी कमी होते.
थकवा येण्याचा त्रास जास्त प्रमाणात असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.