उन्हाळ्यात पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी?

सकाळ डिजिटल टीम

उन्हामुळे पक्षी

उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्रोत आटत असल्याने पक्षी आणि भटके प्राणी पाण्यासाठी तडफडतात. त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

Summer Tips For Bird | Sakal

पाणी

घराच्या बाल्कनीत, गॅलरीत, छतावर किंवा बागेत मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवा. हे भांडे सावलीत असावे.

Keep clean water | Sakal

पाणी वेळोवेळी बदला

गर्मीमुळे पाणी लवकर गरम होते किंवा दूषित होते. त्यामुळे रोज पाणी बदला, जेणेकरून पक्षी आजारी पडणार नाहीत.

Change the water periodically | Sakal

कृत्रिम घरटी

शहरात पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी घराच्या आवारात कृत्रिम घरटी लावा.

artificial nest | Sakal

पाणपोई

जलस्रोतांच्या कमतरतेमुळे पाण्यासाठी पक्षी तडफडतात. शक्य असल्यास, सार्वजनिक ठिकाणी पाणपोई लावा.

panpoi | Sakal

अन्न वाया घालवू नका

पक्ष्यांसाठी तांदूळ, बाजरी, ज्वारीचा भरडा आणि फळांची साल टाकून ठेवा. तेलकट अन्न टाळा.

Don't waste food. | Sakal

जखमी पक्षी

जखमी पक्षी आढळल्यास त्याला सावलीत ठेवा आणि थेंबथेंब पाणी पाजून मदत करा. थेट पाण्यात बुडवू नका.

injured bird | Sakal

निसर्ग वाचवा

प्राणी-पक्षी वाचले तर निसर्गाचा समतोल राखला जाईल. त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे!

save nature | Sakal

मुलांच्या नाश्त्यात समाविष्ट करा 'हे' पदार्थ, लगेच वाढेल एकाग्रता

Healthy Morning Breakfast Habits | Sakal
येथे क्लिक करा