Anushka Tapshalkar
दिवसाची सुरुवात योग्य आणि पौष्टिक आहाराने केली, तर मुलांचं लक्ष आणि शिकण्याची क्षमता नक्कीच वाढते. सकाळचं चांगलं खाणं मेंदूला ऊर्जा पुरवतं, ताकद देतं आणि अभ्यासात लक्ष केंद्रीत ठेवायला मदत करतं.
मुलांना दिवसभर ऊर्जावान आणि लक्ष केंद्रीत ठेवायचं असेल, तर त्यांच्या जेवणात प्रथिने, हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थ आणि कार्बोहायड्रेट्स यांचा समतोल असणं महत्त्वाचं आहे. यामुळे त्यांची ऊर्जा टिकून राहते.
झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीराला पुन्हा ऊर्जा मिळते, मेंदू ताजजातवाना होतो आणि लक्ष वाढतं. यामुळे सकाळ उत्साही आणि अधिक फलदायी होते.
ओमेगा-3 फॅटी ऍसिडसाठी आहारात बदाम, बिया किंवा एवोकॅडोचा समावेश करा. यामुळे मेंदूचं आरोग्य सुधारतं आणि लक्ष केंद्रित करायला मदत होते.
मुलांच्या नाश्त्यात अंडी, दही किंवा नट बटरचा समावेश करा. यामुळे आवश्यक अमिनो अॅसिड मिळतात, जे मेंदूच्या कार्यासाठी आणि स्थिर ऊर्जेसाठी उपयुक्त ठरतात.
मुलांना सकाळी नाश्त्याला तृणधान्य, ओट्स द्या. ते दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करतात, यामुळे सकाळच्या वेळचा थकवा टाळता येतो आणि लक्ष केंद्रीत ठेवायला मदत होते.
मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळवण्यासाठी पालकसारख्या हिरव्या भाज्या किंवा गाजर ऑम्लेट किंवा स्मूदीत घालून द्या.
दूध, चीज किंवा दही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पुरवतात, जे मेंदू आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
केळी, सफरचंद किंवा बेरीजसारखी फळे नैसर्गिक साखर आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवतात, जे स्मृती आणि मेंदूची क्षमता वाढवतात.