सकाळ डिजिटल टीम
तुमचे केस लांबलचक असतील, तर दिवसभर त्यांची निगा राखण्यासाठी वेळ घालवतोच. पण रात्री झोपताना काय करायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो.
केस मोकळे सोडल्यास, त्यांचा गुंता होण्याची शक्यता आहे. गुंतलेले केस सोडवताना ते तुटण्याचा धोका असतो.
जर केस बांधून ठेवले, तर काही वेळेस ते तुटू शकतात, किंवा केसगळती वाढू शकते.
स्ट्रेट केस असतील, तर तुम्ही सैलसर पोनीटेल किंवा वेणी बांधून ठेऊ शकता. हे केसांच्या फ्रिझी होण्यापासून वाचवते.
लांबलचक केस असतील, तर ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते, पण खूप घट्ट बांधू नका, अन्यथा ते तुटू शकतात.
कुरळ्या केसांसाठी, डोक्यावर आंबाडा बांधावा किंवा एका बाजूला बांधून ठेवावा. पण लक्षात ठेवा, ते खूप घट्ट बांधू नका.
केस ओले असताना ते बांधू नका. जर बांधायचं असेल, तर ते सुकल्यानंतरच बांधणे योग्य ठरेल, यामुळे ते तुटणार नाहीत.
ब्लो ड्राय करत असताना देखील केस ओले असताना बांधू नका. शक्य असल्यास नैसर्गिकरित्याच केस सुकवण्याचा प्रयत्न करा.