Google Mapsवर घराचं लोकेशन कसं बदलायचं?

सकाळ डिजिटल टीम

गुगल मॅप्स

गूगल मॅप्सचा वापर करताना लोक होम किंवा वर्क लोकेशन सेव्ह करतात. त्यामुळे प्रत्येकवेळी घराचा पत्ता टायपिंग करावा लागत नाही.

Google Maps

बदलायचा कसा?

तुम्ही दुसऱ्या ठिकाणी रहायला गेलात किंवा गुगल मॅप्सवर चुकीचा पत्ता सेव्ह केलात तर बहुतांश युजरना तो कसा बदलायचा हे माहिती नसतं.

Google Maps

होम लोकेशन

गुगल मॅस्पवर होम लोकेशन सेव्ह केल्यानं येण्याजाण्याची वेळ, ट्राफिक अपडेट आणि पर्यायी मार्ग शोधण्यासाठी मदत होते.

Google Maps

युवर प्लेस

अँड्रॉइड किंवा आयफोनवर गुगल मॅप्स वापरत असाल तर अॅपमध्ये प्रोफाइलवर क्लिक करा. त्यानंतर युवर प्लेस या पर्यायवर जा.

Google Maps

एडिट

युवर प्लेसमध्ये होम पर्याय आहे. तिथं आधीपासून तुमचा पत्ता असेल तर समोर एडिट पर्यायावर क्लिक करून नवा पत्ता आणि योग्य लोकेशन निवडा.

Google Maps

लोकेशन सेव्ह

योग्य पर्याय निवडताच तुमचं लोकेशन सेव्ह होईल. यानंतर जेव्हा तुम्ही होम सर्च कराल तेव्हा गुगल मॅप्स नव्या लोकेशनपासून मार्ग दाखवेल.

Google Maps

जुना हटवायचा कसा?

जुना सेव्ह केलेला पत्ता हटवायचा असेल तर होम पर्यायात रिमूव्ह किंवा डिलीट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही नवा पत्ता पुन्हा अॅड करू शकता.

Google Maps

सजेस्टेड

गुगल अकाउंटमध्ये लॉगइन असणं आवश्यक आहे. पत्ता टायपिंग न करता जो सजेस्ट करतोय त्यात जवळ असलेलं लोकेशन निवडा.

Google Maps

आषाढ स्पेशल! गावरान रस्सा आणि सुकं चिकनची रेसिपी

Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe

|

Sakal

इथं क्लिक करा