मशरूम खराब तर नाहीत ना? चेक करण्याच्या ३ स्टेप, कसे करायचे स्वच्छ?

सकाळ डिजिटल टीम

मशरूम

पावसाळ्यानंतर बाजारात अनेक भाज्या येतात त्यात मशरूमचं प्रमाण जास्त असतं. मशरूम बाजारात पाकिटबंदही मिळते.

Mushroom

खराब

बाहेरून स्वच्छ आणि पांढरे दिसत असले तरी मशरूम आतून खराब असू शकतात. त्यामुळे खरेदी करताना नीट बघून घेतलं पाहिजे.

Mushroom

बुरशी

मशरूमला आतून बुरशी लागलेली असू शकते. असे मशरूम खाल्ल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

Mushroom

फाटलेले

मशरूम पांढऱ्या रंगाचे असतात आणि ते छत्रीसारखे दिसतात. पण पिवळं दिसत असेल तर ते शिळे असू शकतं. छत्रीसारखा भाग जास्त पसरलेला आणि तुटलेला-फाटलेला असेल तर खराब असते.

Mushroom

डाग

मशरूमवर काळे किंवा भुरकटलेले डाग असतील तर ते खराब असू शकतात. त्याला बुरशी असण्याची शक्यता असते. मातीसारखा किंवा लाकडासारखा गंध येत असेल तर मशरूम चांगले असतात.

Mushroom

चिकटपणा

मशरूम मऊ असतील तर ते खाण्यायोग्य असतात. बुरशी लागलेल्या मशरूवर चिकटपणा असतो. असे मशरूम खरेदी करू नका.

Mushroom

मशरूमची स्वच्छता

मशरूमची भाजी किंवा सूप करण्यासाठी गव्हाचे पीठ घ्या. ते मशरूमवर टाकून मिसळा. त्यानंतर मशरूम धुवून घ्या. जास्त वेळ पाण्यात ठेवू नका. स्वच्छ न करता मशरूम खाऊ नका.

Mushroom

दाढी केल्यानंतर तुरटी का लावतात? हजारो वर्षांचा आहे इतिहास

why use alum after shaving

|

Esakal

इथं क्लिक करा