दाढी केल्यानंतर तुरटी का लावतात? हजारो वर्षांचा आहे इतिहास...

Shubham Banubakode

तुरटी वापरण्याची पद्धत

दाढी करताना किंवा छोट्या जखमेवर तुरटी लावण्याची सवय अनेक घरांमध्ये आजही आहे. पण या साध्या दिसणाऱ्या खड्याचा इतिहास तब्बल हजारो वर्षांपूर्वीचा आहे.

why use alum after shaving

|

Esakal

नैसर्गिक अँटीसेप्टिक

तुरटीला मानवाने वापरलेल्या सर्वात जुन्या नैसर्गिक अँटीसेप्टिकपैकी एक मानले जाते. जखम स्वच्छ ठेवणे आणि रक्तस्त्राव कमी करण्यासाठी तिचा उपयोग केला जात असे.

why use alum after shaving

|

Esakal

प्राचीन इतिहास

सुमारे ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्त आणि मेसोपोटेमिया येथे तुरटीचा वापर सुरू झाला. त्या काळात ती जखमांबरोबरच पाणी शुद्ध करण्यासाठीही वापरली जात होती.

why use alum after shaving

|

Esakal

आयुर्वेदातील महत्त्व

आयुर्वेदात तुरटीला ‘स्फटिक’ म्हणून ओळखले जाते. चरकसंहिता आणि सुश्रुतसंहितेत रक्तस्त्राव कमी करण्यासाठी आणि जखमेची काळजी घेण्यासाठी तिचा उल्लेख आढळतो.

why use alum after shaving

|

Esakal

तुरटी वापरण्याची प्रथा

पूर्वी दाढी करताना किंवा युद्धात झालेल्या छोट्या जखमांवर तुरटी वापरण्याची प्रथा होती. त्यामुळे ती सैनिक आणि नाभिकांच्या दैनंदिन वापरातील महत्त्वाची वस्तू बनली.

why use alum after shaving

|

Esakal

तुरटीचा उपयोग

ग्रीक वैद्य हिप्पोक्रेटिस यांनीही जखमांवर तुरटीचा उपयोग सुचवला होता. त्यानंतर ही पद्धत युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर रूढ झाली.

why use alum after shaving

|

Esakal

शेव्हिंग किटचा भाग

आधुनिक रेझर बाजारात आल्यानंतर तुरटीचा खडा शेव्हिंग किटमध्ये नियमितपणे दिला जाऊ लागला.

why use alum after shaving

|

Esakal

रक्तस्त्राव होतो बंद

तुरटीतील पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट वेगाने परिणाम करते. त्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया जलद होते आणि छोट्या जखमांमधील रक्तस्त्राव लवकर कमी होतो.

why use alum after shaving

|

Esakal

औऔषधे किंवा खाद्यपदार्थांची 'कालबाह्यता तारीख' कशा प्रकारे निश्चित केली जाते?

How Is Expiry Date Decided for Medicines and Food Products (9).jpg

|

Esakal

हेही वाचा -