संतोष कानडे
तुम्ही जो मोबाईल हँडसेट वापरता, तो जगामध्ये किती लोक वापरतात, हे शोधता येतं.
गुगलच्या डेव्हलपर डॅशबोर्डवर एखादं विशिष्ट मॉडेल किती जण वापरतात हे कळतं
गुगलची ही माहिती आकड्यात दिसत नाही मात्र Android Version किती टक्के लोक वापरतात हे कळतं.
अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरुनही कळतं. त्यासाठी सिस्टीम अॅप्सचे डाऊनलोड किती आहेत, हे पाहता येतं.
समजा, सॅमसंगच्या एखाद्या विशिष्ट गॅलरी अॅपचे ५०० मिलियन्स डाऊनलोड असतील तर ५० कोटी लोक तो ब्रँड वापरतात, हे कळतं
आणखी एक पद्धत आहे. यात गुगलवर तुम्ही तुमच्या फोनचे नाव आणि Shipment Data किंवा Market Share असे सर्च करा.
यात तुम्हाला त्या विशिष्ट मॉडेलचे एका वर्षात किती कोटी संच विक्री झालं, हे कळेल.
GSMArena अशा प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर तिथे Popularity ऑप्शन दिसेल.
या ऑप्शनमध्ये विशिष्ट फोनला किती लोक सर्च करतात आणि तो किटी ट्रेंडिंग आहे, हे कळतं.
सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही कंपनी विशिष्ट भागातली अचूक संख्या देत नाही. टेलिकॉम कंपन्यांकडेही ही माहिती असते, पण ही माहिती गोपनिय ठेवली जाते.