रेड कार्पेटसाठी लाल रंगच का निवडला? सर्वात आधी कोणासाठी अंथरला?

Mansi Khambe

बिश्केक

किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत जगातील अनेक प्रमुख नेते एकाच मंचावर उपस्थित होते.

Red Carpet History

|

ESakal

रेड कार्पेट

उच्च-स्तरीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये नेत्यांच्या औपचारिक स्वागतावेळी आणि आगमनावेळी दिसणारा रेड कार्पेट (लाल गालिचा) एक सजावट नसून, तो आदर आणि विशेष दर्जाचे प्रतीक आहे.

Red Carpet History

|

ESakal

इतिहास

तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, रेड कार्पेटची ही परंपरा कुठून सुरू झाली आणि तो सर्वप्रथम कोणासाठी अंथरला गेला? चला, रेड कार्पेटचा इतिहास जाणून घेऊया.

Red Carpet History

|

ESakal

जुना उल्लेख

रेड कार्पेटचा सर्वात जुना साहित्यिक उल्लेख प्रसिद्ध ग्रीक नाटककार एस्किलसने इ.स.पूर्व ४५८ मध्ये लिहिलेल्या 'अगामेम्नॉन' या प्राचीन ग्रीक नाटकात केला होता.

Red Carpet History

|

ESakal

नाटक

या नाटकात, क्लायटेम्नेस्ट्रा तिचा पती, अगामेम्नॉनचे भव्य स्वागत करते आणि त्याच्या घरी आगमनासाठी रेड कार्पेट अंथरते. हे स्वागत केवळ आदरापोटी नव्हते; त्याकाळी अशा भव्य मार्गावरून चालणे हे देवतांसाठी योग्य मानले जात असे.

Red Carpet History

|

ESakal

जेम्स मन्रो

१८२१ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मन्रो यांच्या स्वागतासाठी अधिकृतपणे लाल गालिचा अंथरण्यात आला होता. नंतर, १९व्या आणि २०व्या शतकात, शाही कार्यक्रम आणि औपचारिक समारंभांमध्ये लाल गालिचा सामान्य झाला.

Red Carpet History

|

ESakal

आंतरराष्ट्रीय ओळख

अभिनेते आणि ग्लॅमरशी संबंधित झाल्यानंतर लाल गालिच्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. ऑस्करसारख्या कार्यक्रमांमुळे तो विशेषतः लोकप्रिय झाला.

Red Carpet History

|

ESakal

लालच का?

खरं तर, प्राचीन काळापासून लाल रंग समृद्धी, सन्मान आणि राजेशाहीशी जोडला गेला आहे. प्राचीन काळी, लाल रंग तयार करणे कठीण होते, त्यामुळे तो केवळ विशेष आणि विशेषाधिकार असलेल्या व्यक्तींसाठीच राखीव होता.

Red Carpet History

|

ESakal

तुटणाऱ्या ताऱ्याकडे मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का?

Shooting Star

|

ESakal

येथे क्लिक करा