Anushka Tapshalkar
भारतातील मुख्य तीन ऋतूंपैकी एक म्हणजे पावसाळा. आणि इतर ऋतूंप्रमाणेच याही ऋतूत त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. तसंच फक्त उन्हाळ्यातच नाही तर सगळ्याच ऋतूंमध्ये सनस्क्रीन लावणं महत्त्वाचं असतं
ढगांमधून ८०% पर्यंत UVA किरणं त्वचेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे पावसाळ्यातही सनस्क्रीन गरजेचं आहे.
UV किरणं ढगांवरून परावर्तित होऊन त्वचेला थेट इजा करू शकतात.
आता सनस्क्रीन हलक्या, स्किन-फ्रेंडली फॉर्म्युलात येतात. जे त्वचेला पोषण देतात व संरक्षणही करतात.
UVA किरणं वृद्धत्वाची चिन्हं निर्माण करतात, तर UVB मुळे सनबर्न व त्वचा जळते. पण सनस्क्रीन दोघांपासूनही बचाव करतं.
काही सनस्क्रीन त्वचेला मॉइश्चराइझ करण्याचं कामही करतात, त्यामुळे एकाच वेळी दोन फायद्यांची हमी मिळते.
पावसाळ्यात ऑयली त्वचेवाल्यांसाठी हलकं सनस्क्रीन हा एक परफेक्ट पर्याय ठरतो.
सनस्क्रीनमुळे इतर स्किनकेअर प्रॉडक्ट्स ऑक्सिडाइज होत नाहीत आणि ते अधिक परिणामकारक होतात.
सुरक्षिततेसाठी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन निवडा.
उन्हाळा असो वा पाऊस, रोज सनस्क्रीन लावा आणि तुमच्या त्वचेला प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि वातावरणाच्या बदलांपासून वाचवा!
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.