सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात अननस खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो; पण जर अननस आंबट निघाला, तर त्या आनंदावर विरजण पडते. म्हणूनच, अननस खरेदी करताना तो गोड आहे की नाही हे आधीच ओळखल्यास फायदा होतो.
पूर्णपणे पिकलेला अननस बाहेरून चमकदार पिवळ्या रंगाचा असतो आणि त्यावर अगदी थोडेसेच हिरवे डाग दिसतात.
जर अननस जास्त हिरवा दिसत असेल, तर तो अजून पिकलेला नाही असं समजावं. अशा वेळी तो खरेदी करू नका.
पिकलेल्या अननसाच्या टोकावर असलेली पाने गडद हिरव्या रंगाची असतात आणि ती सहज बाहेर येतात.
खरेदी करताना एका पानाला हलकेच ओढून बघा. जर ते सहज बाहेर आले, तर अननस पिकलेला आहे.
एकाच आकाराचे दोन अननस हातात घ्या आणि तुलना करा.
वजनाने जड अननस जास्त रसाळ आणि गोड असतो. त्यामुळे वजन जास्त असलेला अननस निवडा.
अननसाला सुगंध येतो का हे बघा.
जर अननसातून सौम्य, गोडसर वास येत असेल, तर तो पिकलेला आहे. उलट जर वास येत नसेल किंवा आंबूस वास असेल, तर असा अननस टाळावा.
पिवळसर रंग
सहज येणारी पाने
जड वजन
सुगंध
यावरून तुम्ही सहज ठरवू शकता की अननस गोड आहे की नाही, तेही न कापता!
या पद्धतींचा वापर केल्यास पुढच्या वेळी बाजारातून खरेदी करताना गोडसर, रसाळ अननस घरी आणण्याची शक्यता नक्कीच वाढेल.