पुजा बोनकिले
उन्हाळ्यात खरबुज खाणे आरोग्यासाठी चांगले असते.
खरबुज उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
पण बाजारात खरबुज खरेदी करायला गेल्यावर ते गोड आहे की नाही कसं ओळखावे हे जाणून घेऊया.
खरबुज खरेदी करताना त्याचा सुगंध घ्यावा. त्याला एक नैसर्गिक सुंगध असतो.
खरबुज गोड आहे की नाही हे त्याच्या रंगावरून ठरवता येते. खरबुजवर जास्त जाळी असेल तर ते गोड असते.
खरबुजचे वजन जास्त असेल तर ते गोड असते. जर ते वजनाने हलका असेल तर गोड नसेल.
खरबुजाचे देठ कोरडे किंवा वाकलेले असेल तर पिकलेले आणि गोड आहे.
गोड आणि पिकलेले खरबुज हलके टॅप करा. पोकळा आवाज आला की पिकलेले आहे आणि खाण्यासाठी तयार आहे.