प्रेग्नेंसीनंतर ब्रा वापरणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Aarti Badade

प्रसूतीनंतर

प्रेग्नेंसीनंतर ब्रेस्टच्या आकारात अनेक बदल होतात, त्यामुळे योग्य मापाची, आरामदायक आणि ब्रेस्टना चांगला सपोर्ट देणारी ब्रा निवडणे आवश्यक आहे.

Benefits of wearing a nursing bra

|

Sakal

योग्य ब्रा वापरल्यामुळे ब्रेस्टचा जडपणा

योग्य आकाराची ब्रा वापरल्याने प्रसूतीनंतर येणारा ब्रेस्टचा जडपणा कमी होतो आणि दैनंदिन कामे करताना आईला अधिक आरामदायक वाटते.

Benefits of wearing a nursing bra

|

Sakal

वाढलेल्या वजनामुळे

प्रेग्नेंसीनंतर ब्रेस्टचे वजन वाढल्यामुळे पाठ आणि खांद्यांवर येणारा ताण चांगली ब्रा वापरल्याने बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

Benefits of wearing a nursing bra

|

Sakal

नर्सिंग ब्रा

स्तनपान करणाऱ्या मातांसाठी बाजारात मिळणारी विशेष नर्सिंग ब्रा वापरल्यास बाळाला दूध देणे अधिक सोपे आणि सोयीस्कर बनते.

Benefits of wearing a nursing bra

|

Sakal

खूप घट्ट ब्रा वापरणे टाळावे

अतिशय घट्ट ब्रा घातल्याने स्तनांवर नाहक दाब येतो, ज्यामुळे असह्य वेदना होऊ शकतात किंवा दूध वाहण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.

Benefits of wearing a nursing bra

|

Sakal

वेळोवेळी ब्राचा साईज तपासत राहावा

डिलिव्हरीनंतर शरीरात बदल होत असल्याने ब्रेस्टचा आकार वारंवार बदलू शकतो, म्हणूनच वेळोवेळी आपल्या ब्राचा साईज तपासून घेणे गरजेचे आहे.

Benefits of wearing a nursing bra

|

Sakal

हलकी आणि वायर नसलेली सोयीस्कर ब्रा

रात्रीच्या वेळी स्तनांना पूर्ण आराम मिळण्यासाठी कोणतीही घट्ट किंवा वायर असलेली ब्रा न वापरता नेहमी हलकी आणि सुती ब्रा वापरावी.

Benefits of wearing a nursing bra

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुम्हाला ब्रेस्टमध्ये सतत वेदना, सूज किंवा लालसरपणा जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Benefits of wearing a nursing bra

|

Sakal

हार्ट हेल्थसाठी 'ही' 5 फळं ठरतात सुपरफूड!

Fruits for a Healthy Heart

|

Sakal

येथे क्लिक करा