Monika Shinde
सुंदर दिसण्यासाठी आपण रोज ऑफिस किंवा कार्यक्रमला जाताना मेकअप करण्यासाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर करतो.
पण, स्वच्छता न ठेवण्यामुळे त्यात बॅक्टेरिया होण्याची शकता असते.
स्वच्छ केले नाही तर याचा परिणाम म्हणजे आपल्या त्वचेवर पिंपल्स किंवा इन्फेक्शन्स होऊ शकतात. चला, जाणून घेऊया कशा पद्धतीने स्वच्छता करावी.
एका भांड्यात गरम पाणी घ्या त्यात थोडा शाम्पू घाला. आणि त्यात ब्युटी ब्लेंडर टाकून ठेवा. मग १०- १५ मिनिटांनी ते कोरडे करून मेकअप किट मध्ये ठेवा.
जर तुमचं ब्लेंडर जास्त चिकट असल्यास गरम पाणीत थोडा व्हिनेगर मिसळा. यामुळे गडद डाग आणि चिकटपणा सहज निघतात.
रोज ब्लेंडर स्वच्छ करणे होत नसेल तर किमान आठवड्यातून दोन वेळा तरी स्वच्छ करणे आवश्यक आहे. यामुळे ब्लेंडर दीर्घकाळ टिकते आणि त्वचा ही सुरक्षित राहते.