भांडी घासण्याचा स्पंज किती दिवस वापरावा? जाणून घ्या किती दिवसांनी बदलावा आणि कसा ठेवावा?

Anushka Tapshalkar

स्पंज स्वच्छ धुवा

भांडी घासून झाल्यानंतर स्पंज वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित चोळून घ्या. त्यात अडकलेले अन्नाचे बारीक कण पूर्णपणे काढून टाका.

Kitchen Sponge Cleaning Tips

|

sakal

अतिरिक्त पाणी पिळून काढा

स्पंज वापरल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे पिळून काढा. ओलसर स्पंजमध्ये जिवाणूंची वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो लवकर सुकवणे महत्त्वाचे आहे.

Kitchen Sponge Cleaning Tips

|

sakal

व्हिनेगरने करा स्वच्छता

स्पंजमधील दुर्गंधी आणि चिकटपणा कमी करण्यासाठी एका वाटीत समप्रमाणात व्हाइट व्हिनेगर आणि पाणी घ्या. त्यात स्पंज ५ मिनिटे भिजवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

Kitchen Sponge Cleaning Tips

|

sakal

मायक्रोवेव्हचा वापरताना काळजी

ओल्या स्पंजला मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्याने काही जिवाणू कमी होऊ शकतात. मात्र, हा उपाय पूर्ण निर्जंतुकीकरणाची हमी देत नाही. स्पंजमध्ये धातूचा भाग नसावा आणि तो मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित असावा. वापरण्यापूर्वी तो पूर्ण थंड होऊ द्या.

Kitchen Sponge Cleaning Tips

|

sakal

स्पंज नेहमी कोरड्या जागी ठेवा

स्पंज वापरल्यानंतर तो सिंकजवळ पाण्यात किंवा ओलसर जागी ठेवू नका. त्याऐवजी हवेशीर जागी सुकण्यासाठी ठेवा. यामुळे ओलावा कमी राहण्यास मदत होते.

Kitchen Sponge Cleaning Tips

|

sakal

स्पंज खराब झाल्यास लगेच बदला

स्पंजला सतत दुर्गंधी येत असेल, तो चिकट झाला असेल किंवा त्याचे तुकडे पडत असतील, तर तो लगेच फेकून द्या. फाटलेला किंवा खराब झालेला स्पंज वापरणे टाळा.

Kitchen Sponge Cleaning Tips

|

sakal

दर १ ते २ आठवड्यांनी बदला

किचन स्पंज नियमित स्वच्छ केला तरी त्याचा वापर मर्यादित ठेवा. साधारण १ ते २ आठवड्यांनी नवीन स्पंज वापरण्याचा विचार करा. स्पंज किती वेळा वापरला जातो आणि त्याची स्थिती कशी आहे, यानुसार तो आधीही बदलावा लागू शकतो.

Kitchen Sponge Cleaning Tips

|

sakal

हिवाळ्यात गीझर वापरण्यापूर्वी तपासा 'या' ७ गोष्टी; अन्यथा ऐन थंडीत होईल गैरसोय!

Geyser Maintenance Tips

|

sakal

आणखी वाचा