उन्हाळ्यात वाढतोय हाय बीपीचा त्रास? 'हे' 7 उपाय ठेवतील ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये

Anushka Tapshalkar

उन्हाळ्यात वाढू शकतो हाय बीपीचा धोका

कडक उन्हाळा, जास्त घाम आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे ब्लड प्रेशर असंतुलित होऊ शकते. त्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो.

High Blood Pressure in Summer

| sakal

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्या. नारळपाणी आणि लिंबूपाणीही फायदेशीर ठरते.

Stay Hydrated

|

Sakal

मीठाचे प्रमाण कमी ठेवा

जास्त मीठामुळे शरीरात पाणी साचते आणि बीपी वाढू शकतो. प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड पदार्थ टाळणे चांगले.

Salt | sakal

हलका आणि संतुलित आहार घ्या

तळलेले आणि जड पदार्थ कमी खा. फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ आहारात वाढवा. कलिंगड, काकडी आणि केळी फायदेशीर ठरतात.

Healthy Diet

|

sakal

दररोज व्यायाम करा

हलका व्यायाम, योगा किंवा सकाळ-संध्याकाळ चालणे हाय बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

Exercise

| Sakal

ताणतणाव कमी ठेवा

अधिक ताण घेतल्याने ब्लड प्रेशर वाढू शकते. ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि पुरेशी झोप मानसिक शांतता देतात.

Do Yoga and Meditation

|

sakal

कडक उन्हापासून बचाव करा

बाहेर जाताना छत्री, टोपी किंवा स्कार्फ वापरा आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि बीपी वाढण्याचा धोका कमी होतो.

Sun Protection

|

sakal

रोज 8 ग्लास पाणी पिणं खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या 7 मोठे गैरसमज

आणखी वाचा