कांदा कापताना आता डोळ्यात पाणी येणार नाही... 'ही' ट्रिक जाणून घ्या

Aarti Badade

कांदा चिरताना

जेवणाची चव वाढवणारा कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणे किंवा जळजळ होणे ही जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरातील मोठी समस्या आहे.

Onion cutting hacks

|

Sakal

कांद्यामधील 'Syn-Propanethial-S-Oxide' रसायन

कांदा कापताना त्यातून हवेत सोडले जाणारे विशिष्ट रसायन जेव्हा डोळ्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी नैसर्गिकरी्या अश्रू बाहेर पडतात.

Onion cutting hacks

|

Sakal

सुरीला लिंबाचा रस लावा

कांदा चिरण्याआधी सुरीला लिंबाचा रस लावल्यास लिंबातील नैसर्गिक आम्ल कांद्यामधून निघणाऱ्या रसायनाचा प्रभाव कमी करते आणि डोळ्यांची जळजळ थांबवते.

Onion cutting hacks

|

Sakal

१५ ते २० मिनिटे कांदा फ्रिजमध्ये ठेवा

कांदा कापण्यापूर्वी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील थंडपणामुळे गॅस निर्माण करणाऱ्या रसायनाचा वेग मंदावतो आणि ते हवेत कमी पसरते.

Onion cutting hacks

|

Sakal

धारदार सुरीचा वापर करा

बोथट सुरीमुळे कांद्याच्या पेशी जास्त दाबल्या जाऊन अधिक प्रमाणात रसायन बाहेर पडते; म्हणूनच कांदा कापताना नेहमी धारदार सुरी वापरावी.

Onion cutting hacks

|

Sakal

पंखा किंवा एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा

कांदा कापताना स्वयंपाकघरात हवेचा वेगवान प्रवाह असल्यास कांद्या वायूचे कण थेट डोळ्यांकडे न जाता हवेत दुसरीकडे वाहून जातात.

Onion cutting hacks

|

Sakal

चॉपिंग बोर्डवर कांदा कापा

काही तज्ज्ञांच्या मते, ओल्या चॉपिंग बोर्डवर किंवा पाण्याजवळ कांदा कापल्यास हवेत पसरणारे रसायन पाण्यात विरघळून डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही.

Onion cutting hacks

|

Sakal

रोजचे काम होईल अधिक सोपे

कांदा कापताना डोळ्यात पाणी येणे नैसर्गिक असले, तरी लिंबू आणि धारदार सुरीसारख्या सोप्या उपायांमुळे गृहिणींना या त्रासापासून मोठा आराम मिळू शकतो.

Onion cutting hacks

|

Sakal

टाचा दुखण्याकडे करू नका दुर्लक्ष; शरीर देत असू शकते 'या' गंभीर समस्यांचे संकेत!

Heel pain causes in the morning

|

Sakal

येथे क्लिक करा