सकाळ डिजिटल टीम
ऑफिसमध्ये तुमचं काम चांगलं करा, तसंच इतरांच्या वाईट कमेंट्सकडे शक्यतो दुर्लक्ष करा.
तुमच्याबद्दल वाईट विचार करणाऱ्या सहकाऱ्यांसोबत अनावश्यक वाद टाळा. शांततेचा मार्ग स्वीकारा.
कधी समोरासमोर किंवा वादविवाद झाले तर शांतपणे, संयम ठेवून बोला.
कोणीही कसंही वागलं तरी तुम्ही चांगले वागा. तुमच्या कामातूनच तुमचं उत्तर द्या.
गॉसिप करणाऱ्यांपासून लांब राहिलेलं बरं. ऑफिस पॉलिटिक्सपासून जेवढं लांब राहता येईल तितकं लांब राहा.
तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा. तुम्ही केलेल्या कामाची माहिती, अपडेट बॉसपर्यंत देत राहा.
तुमच्या सहकाऱ्यांसोबत चांगलं वागा. प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. कोणाबद्दलही द्वेष करु नका.
व्यक्तिगत भावनांना कामाच्या ठिकाणी येऊ देऊ नका. कामाच्या ठिकाणी नेहमी प्रोफेशनल राहा.