संतोष कानडे
आजकाल हॉटेल रुममध्ये छुप्या पद्धतीने कॅमेरे लाऊन रेकॉर्डिंग करुन ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत
जिथून पूर्ण खोली कव्हर होईल, अशी ठिकाणी कॅमेरा ठेवला जातो. तुम्ही हॉटेलच्या खोलीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी शांततेने रुम निरखून बघून घ्या.
कोणतीही गोष्ट तुम्हाला असामान्य म्हणजे वेगळी वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.
लाईट फिटिंग, भिंतींना असलेल्या भेगा, ड्रेसिंग मिरर, स्मोक डिटेक्टर, टीव्ही युनिट, फोटो फ्रेम, शोपीस या गोष्टी व्यवस्थित बघा.
एखादी वस्तू गरजेपेक्षा समोर ठेवलेली असेल किंवा त्याचा एँगल विचित्र वाटत असेल तर तिथे कॅमेरा असू शकतो.
स्मार्टफोनची फ्लॅश लाईट ऑन करा आणि खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश टाका. विशेषतः मिरर, टीव्ही, लॅम्प, पेंटिंग, डेकोरेशनच्या वस्तू बघा.
जर कुठे तुम्हाला थोडीशी चमक किंवा चमकदार डॉट दिसला तर तो कॅमेऱ्याचा लेन्स असू शकतो. त्यामुळे ही जागा काळजीपूर्वक तपासा.
अनेक हिडन कॅमेरे नाईट व्हिजनसाठी इन्फ्रारेड लाईट सोडतात. खोलीतल्या सगळे दिवे विझवून टाका आणि मोबाईल कॅमेरा ऑन करा.
संशयित ठिकाणी कॅमेरा फिरवा. जर स्क्रिनवर लाल किंवा जांभळ्या रंगाची छोटी लाईट दिसली तर तिथे कॅमेरा असू शकतो.
आजकाल हिडन कॅमेरे हे वायफायने जोडलेले असतात. त्यामुळे मोबाईलमध्ये वायफाय ऑन करा आणि नेटवर्कची लिस्ट बघा.
त्यात तुम्हाला CAM, IPCAM, Device_XX अशी नावं दिसली तर सतर्क व्हा. कारण वायरलेस कॅमेरा असू शकतो.