भात आवडतो, पण जेवल्यावर येणारी झोप नकोय? मग 'हे' उपाय आहेत बेस्ट!

Anushka Tapshalkar

जेवणानंतरची झोप

बऱ्याचजणांना दुपारी जेवल्यानंतर झोप येते. बहुतांश वेळी खाण्याच्या सवयी आणि भात याला कराणीभूत ठरतं. पण भात खाल्ल्यावर येणारी झोप कंट्रोल करणं अवघड असतं. अशा वेळी जेवणात काही बदल करणं फायद्याचं ठरतं.

Sleepiness post meal

|

sakal

योग्य भाताची निवड करा

पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस, तांबडा भात, हातसडीचा किंवा उकड्या तांदळाचा भात खा. फायबर जास्त असल्याने ऊर्जा टिकते.

Choose right type of rice

|

sakal

भातासोबत प्रथिने आवश्यक

भात एकटाच न खाता डाळ, राजमा, चणे, पनीर, अंडी, मासे किंवा चिकनसोबत खा. यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते.

Add Proteins

|

sakal

भरपूर भाज्या जोडा

भाजी, पालेभाज्या किंवा कच्चा सलाड आवर्जून ठेवा. फायबर पचन सुधारते आणि सुस्ती कमी करते.

Add Extra Veggies 

|

sakal

चांगल्या फॅट्सकडे दुर्लक्ष नको

थोडं तूप, नारळाचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल भातावर घाला. हे पोट भरलेलं ठेवून थकवा टाळते.

Don't ignore healthy fats

|

sakal

प्रमाणावर नियंत्रण ठेवा

भात जास्त खाल्ल्याने झोप येते. भात कमी आणि भाजी-प्रथिने जास्त ठेवा. हळू खाण्याची सवय लावा.

Eat Moderately

|

sakal

ताजा व गरम भात खा

ताज्या, गरम भाताचं पचन चांगलं होतं. खूप वेळ ठेवलेला किंवा वारंवार गरम केलेला भात टाळा.

Eat Hot Rice 

|

sakal

जेवणाचा शेवट योग्य करा

भातानंतर थोडं दही घ्या. शेवटी बडीशेप (सौंफ) खाल्ल्याने जडपणा कमी होतो.

End the Meal Properly

|

sakal

गोड लगेच टाळा

भातानंतर लगेच गोड पदार्थ खाल्ल्याने साखर वाढते आणि सुस्ती येते.

Avoid dessert immediately after meal 

|

sakal

जेवणानंतर थोडं चालणं

हलकी चाल रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि जेवल्यावरची झोप घालवते.

Walk Post Meal

| sakal

जेवणानंतर लगेच झोपलं तर शरीरावर कोणते परिणाम होतात?

Side Effects of Sleeping Immediately After Eating

|

sakal

आणखी वाचा