जमिनीखालचं सोनं कसं शोधतात? काय आहे प्रगत तंत्रज्ञान

संतोष कानडे

नुकतंच फ्रान्समध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल १५० टन सोनं सापडलं आहे. सरकारने तो सगळा परिसर सील केला आहे.

जमिनीखाली सोनं असेल तर कसं शोधायचं? आणि त्यासाठीची टेक्नॉलॉजी नेमकी काय असते? हे पाहूया.

ऑर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यो दोन संस्था भारतामध्ये सोनं शोधण्याचं काम करतात.

ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार अर्थात GPR आणि VLF म्हणजेच व्हेरी लो फ्रीक्वेन्सीचा वापर जमिनीखालील सोनं शोधण्यासाठी काढण्यासाठी केला जातो.

व्हीएलएफद्वारे जमिनीखाली तरंग पाठवले जातात. हे तरंग धातूला धडकल्यानंतर ध्वनी उत्पन्न होतो. त्यावरुन धातूचा अंदाज येतो.

तर जीपीआरद्वारे मातीच्या गुणांची चाचणी केली जाते. मातीमध्ये असलेल्या घटकांवरुन जमिनीखाली सोनं असू शकतं की नाही? हे कळतं.

जमिनीखाली सोनं सापडल्यानंतर ते बाहेर काढून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर शुद्ध झालेलं सोनं व्यापारी खरेदी करतात.

फ्रान्सच्या ऑव्हर्गेन भागातील ५२ वर्षीय शेतकरी मिशेल ड्युपॉन्ट यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं सापडलं आहे.

ते नियमितप्रमाणे आपल्या शेतामध्ये पाहाणी करत असताना पाटाच्या पाण्यात काहीतरी चमकत असल्याचं दिसलं.

त्यानंतर त्यांनी तिथे थोडा खड्डा केला आणि त्यांना सोन्याचा साठाच सापडला. हे सोनं दीडशे टनांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातंय.

मुघलांच्या हरममध्ये जास्त वजनाच्या स्त्रीया का आणल्या जायच्या?

mughal
<strong>येथे क्लिक करा</strong>