मऊ, मुलायम, गुलाबी ओठ हवेत? मग वापरा हा लिप बाम

अंकिता खाणे (Ankita Khane)

मऊ, गुलाबी ओठ हे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. ओठांची विशेष काळजी घेण्यासाठी लोक अनेक टिप्स फॉलो करतात.

यासाठी तुम्हाला बाजारात अनेक प्रसिद्ध उत्पादने सहज मिळतील. त्याच वेळी, या उत्पादनांमध्ये असलेले केमिकल तुमचे ओठ गुलाबी बनवण्याऐवजी काळे करू शकतात.

बहुतांशवेळा ओठ लिपस्टिकच्या अतिवापरामुळे काळपट पडतात. हा काळपटपणा लवकर निघत नाही. गुलाबी ओठांसाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून लिप बाम बनवू शकता.

लागणारे साहित्य

गुलाबाच्या पाकळ्या, खोबरेल तेल, पेट्रोलियम जेली, लिप बाम बनवण्याची पद्धत

सगळ्यात आधी तर गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्या. यानंतर एक कप गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्यात पाव कप पाणी टाका आणि हे मिश्रण चांगले उकळून घ्या.

तुम्ही फक्त गुलाबाच्या पाकळ्यांचाच वापर केला तर लिप बामचा रंग गडद गुलाबी येणार नाही. गडद गुलाबी रंगाचा लिप बाम पाहिजे असेल तर त्या पाण्यात थोडं बीटरुटही टाका.

पाणी उकळून झालं की ते गाळून घ्या. जेवढं पाणी असेल त्याच्या अर्ध खोबरेल तेल टाका. खोबरेल तेल जेवढं असेल तेवढंच व्हॅसलिन टाका आणि 1 टीस्पून मध घाला.

व्हॅसलिन आणि खोबरेल तेल टाकण्यापुर्वी ते गरम करून वितळून घ्या आणि मग टाका.

आता सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून काचेच्या डबीत भरून फ्रिजमध्ये ठेवा.

8 ते 10 तासाने लिप बाम चांगला सेट होईल. हा लिप बाम फ्रिजमध्येच ठेवावा.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

milk tea | sakal
येथे क्लिक करा