Aarti Badade
मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. यामुळे त्वचा संवेदनशील होते आणि चेहऱ्यावर काळे डाग पडू लागतात.
Period acne home remedies
Sakal
कोरफडीच्या पानातून ताजा गर काढून तो पिंपल्सवर लावा. २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. दिवसातून दोनदा हा उपाय केल्यास पिंपल्सची जळजळ कमी होऊन त्वचा स्वच्छ होते.
Period acne home remedies
Sakal
कापसाच्या बोळ्यावर थोडे टी ट्री ऑईल घेऊन ते थेट पिंपल्सवर लावा. १० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे पिंपल्समधील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.
Period acne home remedies
sakal
बोटावर थोडे दही घेऊन ते पिंपल्सवर २० मिनिटे लावून ठेवा. दह्यातील लॅक्टिक ॲसिडमुळे पिंपल्स सुकण्यास मदत होते. चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
Period acne home remedies
Sakal
बर्फाचा तुकडा एका स्वच्छ कापडात गुंडाळून पिंपल्सवर ५ ते १० मिनिटे लावा. यामुळे पिंपल्सची सूज आणि लालसरपणा त्वरित कमी होतो, तसेच त्वचा मऊ आणि चमकदार बनते.
Period acne home remedies
Sakal
एका बाऊलमध्ये दूध, पाणी आणि चिमूटभर हळद मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्सवर १५-२० मिनिटे लावून ठेवा. हळदीतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स मुळापासून घालवण्यास मदत करतात.
Period acne home remedies
Sakal
मध आणि दालचिनी पावडर एकत्र करून पिंपल्सवर लावा. यातील पोषक घटकांमुळे त्वचेला पोषण मिळते, सूज कमी होते आणि चेहऱ्यावरील काळे डाग हळूहळू नाहीसे होतात.
Period acne home remedies
Sakal
Eating Fruit on an Empty Stomach spike blood sugar
Sakal