सोनचाफा घराच्या बाल्कनीत कसा फुलवायचा?

Pranali Kodre

सोनचाफा (Golden Champa)

सोनचाफा हा त्यांच्या अंत्यंत सुवासिक पिवळ्या-सोनेरी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. हा सोनचाफा घराच्या बाल्कनीत किंवा अंगणातही फुलवता येतो.

How To Grow Sonchafa At Home?

|

Sakal

कुंडी (Pot)

सोनचाफ्याचं झाड मोठं होत असल्याने सुरुवातीला १२-१५ इंचाची आणि नंतर झाड मोठं व्हायला लागल्यानंतर १८ ते २४ इंच मोठी कुंडी वापरा. कुंडीला पाण्याच्या निचऱ्यासाठी खाली छिद्र हवे.

How To Grow Sonchafa At Home?

|

Sakal

माती (Soil)

पाणी न साचणारी भुसभूशीत (well-draining) माती सोनचाफ्यासाठी उत्तम आहे. यासाठी बागेतील माती, सेंद्रिय खत, वाळू/कोकोपीट यांचं मिश्रण वापरता येतं.

How To Grow Sonchafa At Home?

|

Sakal

सूर्यप्रकाश (Sunlight)

सोनचाफ्याला दररोज किमान ५-६ तास चांगल्या आणि थेट सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे कुंडी चांगला सुर्यप्रकाश येईल अशाच ठिकाणी ठेवा.

How To Grow Sonchafa At Home?

|

Sakal

पाणी (Water)

मातीचा जर वरचा थर सुकल्यासारखा वाटला, तर पाणी द्या. उन्हाळ्यात दररोज, तर हिवाळा-पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्या. कुंडीत पाणी साचले, तर मुळं कुजतात.

How To Grow Sonchafa At Home?

|

Sakal

पोषण

दर महिन्याला दोन मूठ सेंद्रिय खत द्या. तसेच महिन्यातून एकदा केळ्याच्या सालीचे पाणी किंवा बोनमील मातीत टाका. त्यामुळे फुलांची संख्या वाढण्यास मदत होते.

How To Grow Sonchafa At Home?

|

Sakal

छाटणी (Pruning)

कुंडीत झाडाची उंची नियंत्रित ठेवण्यासाठी अधूनमधून छाटणी करा, तसेच छाटणी केल्याने नवीन फांद्या येण्यास मदत होते.

How To Grow Sonchafa At Home?

|

Sakal

महत्त्वाची टीप

बीयांपासून लावलेल्या झाडाला फुलं येण्यास ५-६ वर्षे लागू शकतात, तर नर्सरीतून कलमी रोप आणल्यास सहा महिने ते एक वर्षात फुलं येतात.

How To Grow Sonchafa At Home?

|

Sakal

नारळाला 'कल्पवृक्ष' का म्हणतात?

Why Is Coconut Known as the ‘Kalpavriksha’?

|

Sakal

येथे क्लिक करा