छोट्या बाल्कनीत वांग्याचे झाड कसे उगवावे?

Pranali Kodre

बाल्कनीत वांग्याचे झाड

छोट्या बाल्कनीतही वांग्याचे झाड लावणे अतिशय सोपे आहे.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

कुंडी

वांग्याच्या झाडाची मुळे खोलवर जात असल्यानं कुंडी किमान १२ ते १५ इंचाची असू द्या. १५x१५ इंच आकाराची ग्रो बॅग (Grow Bag) देखील उत्तम पर्याय आहे. तसेच कुंडीच्या खाली छिद्र असावं.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

पोषक माती

चांगल्या निचऱ्याची आणि पोषक माती वांग्याच्या झाडाला लागते.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

मातीचे मिश्रण

५०% बागेतील माती (Garden Soil), ३०% सेंद्रिय खत (गांडूळ खत/कुजलेले शेणखत), २०% कोकोपीट किंवा वाळू, १-२ मूठ कडुनिंबाची पेंड असे साधारण मातीचे मिश्रण असावे.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

रोप

वांग्याच्या बिया साधारण १ सेमी खोल लावा आणि माती थोडी ओलसर ठेवा. साधारण एक-दोन आठवड्यात रोप उगवते.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

सूर्यप्रकाश

वांग्याच्या झाडाला किमान ५ ते ६ तास थेट सूर्यप्रकाशाची गरज असल्याने जिथे ऊन चांगले येते, तिथे हे रोप ठेवा.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

पाणी

कुंडीत फार पाणी साचू देऊ नका, जर मातीचा वरचा थर सुकलेला दिसला, तर पाणी द्या. उन्हाळ्यात मात्र सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

पोषण

वांग्याला चांगल्या पोषणाची गरज असल्याने दर १५ - २० दिवसांनी १-२ मूठ कंपोस्ट/गांडूळ खत द्या.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

केळ्याच्या सालीचे पाणी किंवा ताक

फुले आणि फळे येण्याच्या काळात केळ्याच्या सालीचे पाणी किंवा ताक मातीत टाकल्याचाही फायदा होतो.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

आधार

झाड मोठं झाल्यानंतर त्याला थोडा आधार द्या.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

कीड नियंत्रण

वांग्याच्या झाडाला कीड लागू नये म्हणून दर १५ दिवसांनी १ लिटर पाण्यात ५ मिली कडुनिंबाचे तेल आणि २-३ थेंब लिक्विड सोप टाकून झाडावार फवारणी करा.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

दोन महिन्यात वांगी

वांग्याच्या झाडाला साधारण ६० ते ७० दिवसांत वांगी लागतात.

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

जगातील सर्वात तिखट मिरची कोणती?

WORLD’S HOTTEST CHILI PEPPER X

|

Sakal

येथे क्लिक करा