Pranali Kodre
भारतीय स्वयंपाक घरात दैनंदिन वापर होणाऱ्या गोष्टींमध्ये लिंबाचाही समावेश होता.
How to Grow Lemon Tree at Home
Sakal
दरम्यान, लिंबांचं झाड हे घराच्या बागेतही वाढवता येऊ शकतं.
How to Grow Lemon Tree at Home
Sakal
घरच्या घरी किंवा कुंडीत लिंबाचं झाड वाढण्यासाठी नर्सरीतून कलमी (Grafted) किंवा 'एअर लेअरिंग' (Air Layering) केलेलं रोप आणावं.
How to Grow Lemon Tree at Home
Sakal
बियांपासून लावलेल्या झाडाला फळ यायला ५-७ वर्षे लागतात, पण कलमी झाडाला १-२ वर्षात फळ येऊ शकतात.
How to Grow Lemon Tree at Home
Sakal
कुंडीत लावण्यासाठी 'कागदी लिंबू' (Kagzi Lime) किंवा 'बारमाही लिंबू' या जाती सर्वोत्तम मानल्या जातात.
Kagzi Lime
Sakal
लिंबाच्या झाडाची मुळं पसरत असल्याने थोडी आकाराने मोठी घ्या, तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीला छिद्र ठेवा.
How to Grow Lemon Tree at Home
Sakal
लिंबाच्या झाडाला भूसभूशीत माती आवडते. त्यासाठी ४० टक्के बागेतील माती, ३० टक्के कंपोस्ट किंवा गांडूळ खत, २० टक्के वाळू आणि १० टक्के कडुनिंबाची पेंड असे मिश्रण ठेवा.
How to Grow Lemon Tree at Home
Sakal
लिंबाच्या झाडाला उष्णता आणि कडक ऊन आवडते. त्याला ७-८ तास सूर्यप्रकाश द्या.
How to Grow Lemon Tree at Home
Sakal
लिंबाच्या झाडाला रोज पाणी न देता जर माती २ इंच कोरडी लागली, तरच पाणी द्या. जेव्हा झाडाला फुलं आणि फळं लागतात, तेव्हा माती हलकी ओलसर ठेवा.
How to Grow Lemon Tree at Home
Sakal
लिंबाच्या झाडाला पोषणाचीही गरज असल्याने महिन्याला खत टाका. लिंबू लागण्यासाठी पोटॅशियम आणि फॉस्फरसची गरज असते, त्यामुळे 'बोन मील' (Bone Meal) किंवा घरच्या घरी केळ्यांच्या साली सुकवून त्याचे पावडर खत म्हणून देऊ शकता.
लिंबाच्या झाडाची नियमित छाटणी करा आणि कीड नियंत्रित करण्यासाठी नीम ऑईल स्रेसारख्या उपाययोजना करा.
जर झाडाची वाढ चांगली झाली आहे पण फुलं येत नसतील, तर झाडाला २-३ दिवस पाणी देणं पूर्णपणे बंद करा. यामुळे झाडाला 'स्ट्रेस' (Stress) मिळतो, त्यानंतर झाडाला पाणी देण्याचा फायदा होतो.
Balcony Medicinal Plants
Sakal