Pranali Kodre
घराच्या खिडकीत किंवा छोट्या बाल्कनीक काही झाडं छान वाढू शकतात, त्यातील एक म्हणजे चेरी टोमॅटो.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
चेरी टोमॅटो आकाराने लहान असल्यामुळे ते खिडकीच्या किंवा बाल्कनीच्या मर्यादित जागेतही चांगले वाढतात.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
चेरी टेमॅटोचे रोप लावण्यासाठी किमान १० ते १२ इंच खोल आणि १० ते १५ लिटर क्षमतेची कुंडी निवडा, तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीला छिद्र असावे.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
चेरी टोमॅटोचे रोप लावण्यासाठी ५०% बागेची माती (Garden Soil), ३०% शेणखत किंवा गांडूळ खत (Vermicompost) आणि २०% कोकोपीट (Cocopeat) किंवा वाळू असे मातीचे मिश्रण ठेवा.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
नर्सरीतून चेरी टोमॅटोचे छोटे रोप आणू शकतो किंवा घरी उपलब्ध ताज्या चेरी टोमॅटोच्या बिया वाळवून रोप तयार करता येते.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
बिया अर्धा इंच तरी खोल पेरा आणि हलके पाणी शिंपडा, साधारण ५-८ दिवसात लहान अंकुर बाहेर येतात. थेट नर्सरीतून रोप आणल्यास ते लावणे अधिक सोपे.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
चेरी टोमॅटोच्या झाडाला ६ ते ८ तास थेट सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे ज्या खिडकीतून किंवा ज्या बाजूने बाल्कनीत चांगले ऊन येथे तिथे चेरी टोमॅटोचे झाड ठेवा. कमी सूर्यप्रकाशात हे झाड फार फुलत नाही.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
चेरी टोमॅटोसाठी माती किंचित ओलसर ठेवा, तसेच वरचा १-२ सेमी मातीचा थर थोडा कोरडा वाटला, तरच पाणी द्या. जास्त पाणी दिल्यास मुळे कुजू शकतात.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
दोन आठवड्यातून एकदा कंपोस्ट, गांडूळखत किंवा सेंद्रिय खत द्या. मातीत थोडे अंड्याचे टरफल कुस्करून घातल्यास रोपाला कॅल्शियम मिळते आणि फळे कुजत नाहीत.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
चेरी टोमॅटोचे झाड २-३ फूट वाढू शकत असल्याने बांबूची काठी किंवा छोटा ट्रेलिस लावून झाडाला आधार द्या.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
याशिवाय फुले आल्यावर रोप हलके हलवा किंवा छोट्या ब्रशने एका फुलातील परागकर दुसऱ्यावर लावा.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
साधारण ६० ते ८० दिवसात लाल चमकदार चेरी टोमॅटो तोडायला तयार होतात.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
खिडकी किंवा बाल्कनीत लावण्यासाठी चेरी टोमॅटोच्या टायनी टीम (Tiny Tim), रेड रॉबिन (Red Robin), मायक्रो टॉम(Micro Tom) आणि बाल्कनी रेड (Balcony Red) या जाती उत्तम आहेत.
Grow Cherry Tomatoes on a Windowsill at Home
Sakal
Grow Curry Leaf Plant at Home
Sakal