कुंडीत कढीपत्ता कसा वाढवायचा?

Pranali Kodre

कढीपत्ता

घरात किंवा बाल्कनीत कुंडीत कढीपत्ताच्या (Curry Leaves) झाडाची लागवड करणे अतिशय सोपे आहे.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

झाडाची काळजी

योग्य पद्धत वापरली आणि नियमित काळजी घेतल्यास कुंडीतील कढीपत्ता देखील हिरवागार आणि सुगंधी पानांनी भरून राहातो. (Curry Leaf Plant Care)

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

कुंडी

कढीपत्ता लावण्यासाठी मोठी कुंडी वापरा, साधरण कुंडी किमान १२ ते १६ इंचाची तरी असावी. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीला तळाची छिद्र असावं.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

मातीचे मिश्रण

कढीपत्त्याचं रोप लावण्यासाठी ५०% बागेतील माती, ३०% गांडूळखत /शेणखत/कंपोस्ट आणि २०% वाळू किंवा कोकोपीट (माती हलकी राहण्यासाठी) असे मिश्रण असावे.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

रोप

नर्सरीतून रोप आणून लावणे सर्वात सोपे आहे. हे रोप कुंडीत माती भरून मधे ठेवा, मुळांना इजा न पोहोचवता मातीने ती मुळं झाका. त्यानंतर हलके पाणी द्या.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

सूर्यप्रकाश

कढीपत्त्याच्या झाडाला पुरेसा सूर्यप्रकाशाची गरज असते. किमान ४-६ सूर्यप्रकाश मिळेल, याची काळजी घ्या.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

पाण्याचे प्रमाण

कढीपत्त्याच्या कुंडीतील मातीचा वरचा १ इंचाचा थर वाळल्यासारखा वाटला, तरच पाणी द्या. कुंडीत खूप पाणी साचू देऊ नका. अतिपाण्यामुळे झाडाची मुळं कुजतात आणि पाने पिवळी पडतात.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

छाटणी

झाड थोडं मोठं झाले की वरचा शेंडा कापा. तसेच वेळोवेळी छाटणी करा. त्यामुळे नवीन फांद्या फुटून झाड डेरेदार बनते. तसेच पिवळी पान काढून टाका, ज्यामुळे झाडाची ऊर्जा वाचते.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

आंबट ताकाचा वापर (Best Home Remedy)

महिन्यातून दोनदा २ चमचे आंबट ताक १ लिटर पाण्यात मिसळून मुळाशी टाका. त्यामुळे झाड हिरवेगार आणि झपाट्याने वाढण्यास मदत होते.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

चहापत्तीचे खत

वापरलेली चहापत्ती स्वच्छ धुवून व वाळवून महिन्यातून एकदा थोडी कुंडीच्या मातीत मिसळा,त्याचाही फायदा झाडाला होतो.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

कीड नियंत्रण

कीड नियंत्रित ठेवा, त्यासाठी एक लिटर पाण्यात १ चमचा कडुनिंबाचे तेल (Neem Oil) आणि दोन थेंब लिक्विड सोप मिसळून आठवड्यातून एकदा झाडावर फवारा.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

दोन वर्षांनी मोठी कुंडी

कढीपत्त्याचे झाड मोठं होत असल्याने दोन वर्षांनी त्याची लागवड आणखी मोठ्या कुंडीत करता येऊ शकते.

Grow Curry Leaf Plant at Home

|

Sakal

सावलीत वाढणारी सुंदर फुलझाडे कोणती?

Flowering Plants That Grow Well in Shade

|

Sakal

येथे क्लिक करा