सकाळ डिजिटल टीम
चिया सीड्स पोषक घटकांनी समृद्ध असतात आणि योग्य काळजी घेतल्यास घरातील कुंडीत फक्त काही दिवसांत त्यांचे अंकुर सहज फुटतात.
Chia Seeds Cultivation
sakal
लागवडीसाठी चांगल्या दर्जाचे बी निवडावे, साधारण ८ ते १० इंच खोल कुंडी घ्यावी आणि त्यात उत्तम निचरा होणारी सुपीक माती भरावी.
Chia Seeds Cultivation
sakal
माती हलकी ओलसर करून त्यावर बिया समान अंतरावर पसराव्यात आणि वरून मातीचा अतिशय पातळ थर देऊन बिया झाकून घ्याव्यात.
Chia Seeds Cultivation
sakal
बिया पेरल्यानंतर स्प्रे बॉटलने हलके पाणी मारावे, कारण पाण्याच्या मोठ्या धारेमुळे बिया जागेवरून हलण्याची शक्यता असते.
Chia Seeds Cultivation
sakal
कुंडी अशा ठिकाणी ठेवावी जिथे रोज ४ ते ६ तास हलके ऊन मिळेल, कारण अतिशय कडक ऊन छोट्या रोपांना नुकसान पोहोचवू शकते.
Chia Seeds Cultivation
sakal
माती नेहमी हलकी ओलसर ठेवावी, पण जास्त पाणी देणे टाळावे; कुंडीत जास्त पाणी साचल्यास रोपांची मुळे सडून ती खराब होऊ शकतात.
Chia Seeds Cultivation
sakal
साधारण ७ ते १४ दिवसांत चिया सीड्सची छोटी-छोटी रोपे बाहेर येऊ लागतात, ज्यातील सुकलेली पाने वेळोवेळी काढून टाकणे गरजेचे असते.
Chia Seeds Cultivation
sakal
रोपे व्यवस्थित वाढल्यानंतर त्यांच्या पानांचा आहारात वापर करता येतो, तर बिया हव्या असल्यास रोपांना पूर्ण वाढू देऊन त्यावर फुले आणि बिया तयार होऊ द्याव्यात.
Chia Seeds Cultivation
sakal
ऋग्वेदातील उल्लेखापासून ते बुद्धांच्या काळापर्यंत; किती जुनी आहे गंगा नदी?
Origin of River Ganga
sakal