Pranali Kodre
स्वत:च्या हाताने घरच्या घरी पिकवलेल्या भाज्यांचा आस्वाद घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण अनेकदा भाज्या कशा लावायच्या असा प्रश्न पडतो.
Vegetables To Grow at Home
Sakal
सुरुवातीला अगदी कमी जागेत, कुंडीत किंवा गॅलरीत सहज उगवता येणाऱ्या भाज्यांपासून सुरुवात करू शकतो. (Vegetables To Grow at Home)
Vegetables To Grow at Home
Sakal
अख्खे धने थोडे हाताने चोळून त्याचे दोन भाग करा आणि मातीवर पसरवा. त्यावर हलक्या मातीचा थर द्या. ३५ ते ४० दिवसात कोथिंबीर काढण्यासाठी तयार होते.
Coriander
Sakal
मेथीच्या बिया ६-८ तास पाण्यास भिजवून ठेवा आणि नंतर पसरट कुंडी किंवा ट्रेमध्ये मातीवर पसरवा, त्यावर बारीक माती टाका. साथारण २५ ते ३० दिवसात मेथी तयार होते.
Fenugreek
Sakal
सुक्या लाल मिरचीतल बिया काढून कोकोपीट किंवा मातीत पेरून रोप तयार करा. रोप ४-५ इंचाचे झाल्यानंतर थोड्या मोठ्या कुंडीत लावा. साधारण २-३ महिन्यात झाडावा मिरच्या लागतात.
Chilli Plant
Sakal
टोमॅटोच्या चकत्या कपून थेट मातीत पेरा, त्यातून छोटे रोप तयार होईल. ते रोप नंतर मोठ्या कुंडीत लावा. टोमॅटोची वेल असल्याने तिला आधार द्या. साधारण ७०-८० दिवसात लाल टोमॅटो मिळतात.
Tomato Plant
Sakal
पुदिन्याच्या जाड दांड्या थेट मातीत रोवल्या किंवा २ दिवस पाण्यात ठेवल्यास त्याला मुळे फुटतात. त्यानंतर मोठ्या परसट कुंडीत लावा. पुदिना वेगात पसरतो, तसेच एकदा लाववेला पुदिना वर्षभर येत राहातो.
Mint Plant
Sakal
१२–१५ इंच खोल आणि रुंद कुंडी किंवा १५–२० लिटरची ग्रो बॅगमध्ये बिया पेरा. ६-८ तास सूर्यप्रकाश मिळेल, याची काळजी घ्या. रोप मोठे झाल्यावर वेलीला आधार द्या. साधारण ७० ते ९० दिवसात वांगी तयार होतात.
Eggplant
Sakal
मेथी किंवा कोथिंबीरसाठी पसरट आणि कमी खोलीच्या कुंड्या, तर टोमॅटो, मिरची किंवा वांगीसाठी मोठी कुंडी वापरा, ज्याला खाली छिद्र असू देत. भाज्यांना पुरेसा सूर्यप्रकाश द्या.
Vegetables To Grow at Home
Sakal
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal