Pranali Kodre
घराच्या घरी कृष्णकमळाची (Passion Flower) वेल लावणे खूप सोपे आहे. ही वेल दिसायलाही सुंदर आणि आकर्षक असते.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
कृष्णकमळाच्या वेलीची मुळे वेगाने पसरत असल्याने किमान १२ ते १५ इंचाची मोठी आणि खोल कुंडी निवडा. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीला खाली छिद्र असू द्या.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
कृष्णकमळाच्या वेलीला भुसभुशीत आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती गरजेची असते. यासाठी ५० टक्के बागेतील माती, ३०% वर्मीकंपोस्ट किंवा शेणखत २०% वाळू (Sand) किंवा कोकोपीट असे मिश्रण करता येते.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
नर्सरीतून रोप आणू शकता किंवा चांगल्या वेलीची छाटलेली फांदी लावूनही रोप तयार करू शकता. रोप लावल्यानंतर लगेच भरपूर पाणी द्या.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
कृष्णकमळाच्या वेलीला ५ ते ६ तास चांगला आणि थेट सूर्यप्रकाश गरजेचा असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश मिळेल, अशा ठिकाणी कुंडी ठेवा.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
ही वेल असल्याने तिला आधाराची गरज असते, त्यामुळे योग्य असा आधार वेलीला द्या.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
मातीचा वरचा थक सुकल्यानंतर पाणी द्या आणि पाणी कुंडीत साचून राहणार नाही, याची काळजी घ्या.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
चांगल्या वाढीसाठी महिन्यातून एकदा वर्मीकंपोस्ट, कडुनिंबाची पेंड (Neem Cake) किंवा 'फॉस्फरस'युक्त खत द्या.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
पावसाळा संपल्यानंतर किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला वेलीची हलकी छाटणी (Pruning) करा, ज्यामुळे नवीन फुटवे फुटतील.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
तसेच कीड नियंत्रणासाठी महिन्यातून दोनदा कडुनिंबाच्या तेलाच्या फवारणीसारखे उपाय करा.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
कृष्णकमळाच्या वेलीला उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अधिक फुलं येतात, हिवाळ्यात वाढ संथ होते, त्यामुळे त्यावेळी जास्त खत देणे टाळा.
Tips to Grow Beautiful Krishna Kamal
Sakal
Office Desk Plants
Sakal