घरच्या बाल्कनीतूनच ताजी कोथिंबीर मिळवा! लावायची कशी? जाणून घ्या

Pranali Kodre

कोथिंबीर

कोथिंबीर भारतीय स्वयंपाक घरात जवळपास दररोजच्या वापरली जाते. पदार्थांना उत्तम स्वाद आणि सुवास देणारी ही कोथिंबीर घरच्या घरीही बाल्कनीच सहज उगवली जाऊ शकते. (Grow Coriander at Home)

Grow Coriander at Home

|

Sakal

धणे दोन तुकड्यात फोडा (Coriander seeds)

कोथिंबीर लावण्यासाठी आधी धणे हलक्या हाताने किंवा लाटण्याने रगडून भूगा न करता केवळ दोन तुकडे करा.

Grow Coriander at Home

|

Sakal

भिजवून किंवा न भिजवता पेरता येतात धणे

धणे लवकर उगवण्यासाठी ते रात्रभर किंवा ५-६ तास पाण्यात भिजवले तरी चालतात. पाण्यात न भिजवताही धणे पेरता येतात.

Grow Coriander at Home

|

Sakal

कुंडी (Pot)

कोथिंबीरीसाठी रुंद आणि साधारण ४-६ इंच खोल कुंडी घ्या. कुंडीला पाण्याच्या निचऱ्यासाठी छिद्र असू द्या.

Grow Coriander at Home

|

Sakal

मातीचे मिश्रण (Soil)

५०% बागेतील माती + २५% सेंद्रिय खत + २५% कोकोपीट किंवा वाळू असे मातीचे मिश्रण असू द्या.

Grow Coriander at Home

|

Sakal

पेरणी

कुंडीत भरलेल्या मातीत तुकडे केलेल धणे समान अंतरावर पेरा, धणे घनदाट पेरू नका. त्या धण्यांवर अर्धा इंच मातीचा किंवा कोकोपीटचा थर द्या.

Grow Coriander at Home

|

Sakal

पाणी (Watering)

पेरल्यानंतर हलके पाणी शिंपडा. तसेच कोथिंबिरीला मातीत ओलावा राहिल इतकेच पाणी द्या. अतिपाण्याने मुळं कुजतात.

Grow Coriander at Home

|

Sakal

सूर्यप्रकाश (Sunlight)

कुंडी ३-४ तास हलका सूर्यप्रकाश येईल अशा जागी ठेवा. कडक ऊन लागणार नाही, याची काळजी घ्या.

Grow Coriander at Home

|

Sakal

कोथिंबीर काढणी (Harvesting)

साधारण ७ ते १० दिवसांत धण्याला अंकुर येऊन छोटी रोपं दिसायला लागतात. त्यानंतर ३ ते ४ आठवड्यांत कोथिंबीर वापरण्यास तयार होते.

Grow Coriander at Home

|

Sakal

कापणी

कोथिंबीर मुळासकट न उपटता फक्त वरची पाने काढल्याने त्याच रोपाला पुन्हा नवी कोथिंबीर फुटते.

Grow Coriander at Home

|

Sakal

महत्त्वाची टीप

एकाच वेळी खूप धणे पेरण्याऐवजी ८-१० दिवसांच्या अंतराने थोडे-थोडे धणे पेरले, तर घरात सतत ताजी कोथिंबीर मिळत राहील.

Grow Coriander at Home

|

Sakal

पुण्याच्या पर्वतीवर ३०० वर्षांचा जिवंत साक्षीदार!

300-Year-Old Tree on Parvati Hill, Pune

|

Sakal

येथे क्लिक करा