आलं घरच्या घरी कुंडीत कसं लावायचं?

Pranali Kodre

आलं (Ginger)

आलं हे भारतीय स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पण तुम्हाला माहित आहे का आलं घरी कुंडीत किंवा बागेत सहज लावता येतं.

Grow Ginger at Home

|

Sakal

योग्य आलं

आलं आणल्यानंतर आणताना त्याला छोटे हिरवे किंवा पांढरे अंकुर आलेत का पाहा.

Grow Ginger at Home

|

Sakal

अंकुर आले नसतील, तर...

जर अंकुर आले नसतील, तर आलं एक-दोन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर रे कोरडं करा, त्यानंतर काही दिवसात त्याला अंकुर येतील.

Grow Ginger at Home

|

Sakal

कुंडी (Pot)

आल्याची मुळं पसरत असल्याने खोलपेक्षा रुंद कुंडी किंवा टब निवडा. पण कुंडीच्या खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असावं.

Grow Ginger at Home

|

Sakal

मातीचे मिश्रण (Soil)

आल्याला भुसभुशीत माती लागते. ३०% साधी माती, ३०% कोकोपीट/वाळू आणि ४०% सेंद्रिय खत (शेणखत किंवा गांडूळ खत) असं मातीचं मिश्रण वापरता येऊ शकतं.

Grow Ginger at Home

|

Sakal

लागवड (Ginger Plantation)

आल्याचे २-३ इंच मोठे तुकडे करा, त्या प्रत्येक तुकड्यावर अंकुर असावा. हे तुकडे कुंडीच्या मातीत खोल खड्डा करून लावा. यावेळी अंकुर वरच्या दिशेला राहिल, याची काळजी घ्या. त्यावर वरुन हलकी माती टाका.

Grow Ginger at Home

|

Sakal

पाणी (Water)

माती ओलसर राहिल, इतकंच पाणी द्या. कुंडीत पाणी साचू देऊ नका, नाहीतर आलं कुजण्याची शक्यता असते.

Grow Ginger at Home

|

Sakal

सूर्यप्रकाश (Sunlight)

आल्याच्या रोपाला अप्रत्यक्ष किंवा सौम्य प्रकाश मिळेल, अशी जागा निवडा. आल्याला सकाळचे २-३ तासाचा सूर्यप्रकाश पुरेसा असतो. खूप कडक उन्हात आल्याची कुंडी ठेवू नका.

Grow Ginger at Home

|

Sakal

खत

आल्याला १५-२० दिवसातून थोडं खत द्या.

Grow Ginger at Home

|

Sakal

कधी तयार होतं आलं?

आलं लावल्यानंतर साधारण ७-८ महिन्यात ते पूर्ण तयार होतं. रोपाची पानं पिवळी पडू लागली की आलं काढणीसाठी तयार झाल्याचं समजावं. गरज पडल्यास गरजेपुरतं आलं माती उकरून काढून वापरू शकतो.

Grow Ginger at Home

|

Sakal

छोट्या बाल्कनीत वांग्याचे झाड कसे उगवावे?

Grow Brinjal in Balcony

|

Sakal

येथे क्लिक करा