घरात मनी प्लांट वाढवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Pranali Kodre

Money Plant

मनी प्लांट किंवा पोथोस हे घरात लावण्यासाठीचं लोकप्रिय रोप आहे. पण मनी प्लांटची वाढ चांगली व्हावी आणि पानेही मोठी व हिरवीगार रहावीच यासाठी काळजी घेणेही महत्त्वाचे असते.

Money Plant Care Tips

|

Sakal

खूप पाणी देणे टाळा

कुंडीतील माती २ इंच पूर्ण कोरडी जाणवल्याशिवाय पाणी देऊ नका. उन्हाळ्यात आठवड्यातून २-३ वेळा आणि हिवाळा व पावसाळ्यात ५-६ दिवसातून एकदा पाणी पुरेसे होते.

Money Plant Care Tips

|

Sakal

पाण्याचा निचरा

अतिरिक्त पाणी साचून न राहाता निघून जाण्यासाठी कुंडीच्या तळाला छिद्र राहूद्या. अतिपाण्यामुळे मुळं कुजून मनी प्लांट खराब होण्याचा धोका असतो.

Money Plant Care Tips

|

Sakal

अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश

मनी प्लांटला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (Indirect Sunlight) जास्त योग्य असतो. थेट उन्हामुळे पाने पिवळी पडू शकतात. त्यामुळे घरात खिडकीजवळ किंवा चांगली हवा आणि उजेड असेल, अशा बाल्कनीत हे झाड छान वाढते.

Money Plant Care Tips

|

Sakal

Moss Stick

मनी प्लांटसाठी कुंडीच्या मध्ये मॉस स्टिक म्हणजे मॅट किंवा नारळाच्या शेंडीची काठी लावली तर वेलीला हवेत फुटणारी मुळं या स्टिकमध्ये रुजतात. यामुळे झाला जास्त पोषण मिळते आणि पानांचा आकारही मोठा होतो.

Money Plant Care Tips

|

Sakal

खत

मनी प्लांटला फार खताची आवश्यता नसते, पण महिन्यातून एकदा गांडूळ खत थोडे देऊ शकता. तसेच वापरलेली चहापत्ती धुवून वाळवून मातीत टाकू शकता.

Money Plant Care Tips

|

Sakal

छाटणी

वेळोवेळी पिवळी आणि सुकलेली पाने काढून टाका. जर प्लांट लांब आणि पातळ होत असेल, तर वरचे टोक थोडे कापा. ज्यामुळे नवीन फांद्या फुटतात.

Money Plant Care Tips

|

Sakal

कडक थंडी किंवा अतिखत टाळा

पाने काळी पडण्याचे कारण कडक थंडी किंवा अतिखतही असू शकते, त्यामुळे ही परिस्थितीही टाळता येऊ शकते.

Money Plant Care Tips

|

Sakal

धुळ साफ करा

याशिवाय पानांवरील धुळही साफ करा, धुळ साचल्यास प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) चांगले होत नाही.

Money Plant Care Tips

|

Sakal

Rice Water

महिन्यातून एकदा मनी प्लांटला Rice Water (धुतलेले तांदळाच्या दुप्पट पाणी) देऊ शकतो. त्यामुळे पाने चमकदार आणि निरोगी दिसतात.

Money Plant Care Tips

|

Sakal

योग्य कुंडी

रोपाला पुरेशी मोठी कुंडी वापरा, ज्यामुळे मुळांना वाढ होण्यासाठी जागा मिळेल.

Money Plant Care Tips

|

Sakal

जास्वंदाच्या झाडाला कीड लागली? करा हे सोपे उपाय

Hibiscus plant care

|

Sakal

येथे क्लिक करा