रताळ्याची लागवड करा घरच्या घरी अन् वेलीने वाढवा बाल्कनीची शोभा!

Pranali Kodre

रताळे (Sweet Potato)

रताळे भारतात अनेकदा उपवासात खाल्ले जाते. रताळे घरच्या घरीही कुंडीत अगदी सहज लावता येतात. (Grow Sweet Potatoes at Home)

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

रताळे अर्धे पाण्यात बुडवून ठेवा

निरोगी रताळे घेऊन रताळे अर्धे पाण्यात बुडतील अशा पद्धतीने एका भांड्यात ठेवा. त्याला १-२ आठवड्यांत मुळ्या आणि वर हिरवे अंकुर (Slips) फुटतील.

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

मुळे करा मजबुत

अंकुर थोडे २-३ इंच मोठे झाल्यावर ते हळूवार तोडून दुसऱ्या पाण्यात ठेवल्यास मुळे अजून मजबूत होतात.

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

कुंडी (Pot)

रताळे जमिनीखाली वाढत असल्याने किमान १२ ते १५ इंच खोल आणि रुंद कुंडी घ्या किंवा ग्रो बॅग वापरा.

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

मातीचे मिश्रण (Soil)

५०% बागेची माती, ३०% वर्मीकंपोस्ट/शेणखत आणि २०% वाळू/कोकोपीट असे मातीचे मिश्रण करा. माती भुसभुशीत पाहिजे.

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

लागवड (Planting)

तयार झालेले अंकुर मातीत २-३ इंच खोल पुरा आणि लगेचच थोडे पाणी द्या.

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

सूर्यप्रकाश (Sunlight)

रताळ्याच्या वेलीला ५-६ तास चांगला सूर्यप्रकाश मिळेल, अशा ठिकाणी कुंडी ठेवा.

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

पाणी अन् खत (Watering and Vermicompost)

मातीचा वरचा थर सुकला, तरच पाणी द्या. अतिपाण्याने रताळी सडू शकतात. तसेच महिन्यातून एकदा सेंद्रिय खत द्या.

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

काढणीची वेळ

लागवडीनंतर साधारण ४ महिन्यांद रताळी तयार होतात. वेलीवरील पाने पिवळी पडू लागली की काढणीची वेळ जवळ आली असे समजा.

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

वेली वाढवतात शोभा (Sweet Potato Vines)

रताळ्याच्या वेली दिसायला खूप सुंदर असतात, त्यामुळे त्या बाल्कनी किंवा खिडकीचीही शोभासुद्धा वाढवतात.

Grow Sweet Potatoes at Home

|

Sakal

बेडरूमसाठी कोणती झाडं आहेत बेस्ट?

Best Bedroom Plants

|

Sakal

येथे क्लिक करा