Pranali Kodre
घरच्या घरी टोमॅटो पिकवणे खूप सोपे आहे.
Growing Tomatoes at Home
Sakal
टोमॅटोची मुळे खोलवर पसरत असल्याने त्यासाठी १२ ते १५ इंच खोल आणि रुंद कुंडी वापरा किंवा ग्रो-बॅगही वापरता येते.
Growing Tomatoes at Home
Sakal
कुंडीच्या तळाची पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र (Drainage hole) असणेही गरजेचे आहे.
Growing Tomatoes at Home
Sakal
मातीच्या मिश्रणासाठी ४० टक्के बागेतील माती, ३० टक्के गांडूळखत किंवा शेणखत, २० टक्के कोकोपीट आणि १० टक्के वाळू/रेती वापरा.
Growing Tomatoes at Home
Sakal
घरातील चांगल्या टोमॅटोच्या बिया किंवा दुकानातून हायब्रिड बिया आणून एका छोट्या ट्रे किंवा कपमध्ये लावा. ३-४ आठवड्यात रोपं ४-५ इंच वाढतात.
Growing Tomatoes at Home
Sakal
नर्सरीतूनगही ३-४ इंचाचे रोप थेट आणता येते.
Growing Tomatoes at Home
Sakal
हे रोप कुंडीतील मातीच्या मिश्रणात लहान खड्डा करून लावता येते. रोपाचे खोड थोडे खोलवर लावले, तर त्यालाही नवीन मुळं फुटून रोप मजबूत होतं. रोप लावल्यावर सुरुवातीला भरपूर पाणी द्या.
Growing Tomatoes at Home
Sakal
टोमॅटोच्या झाडाला रोज ६ ते ८ तास थेट ऊन मिळणे गरजेचे असते.
Growing Tomatoes at Home
Sakal
टोमॅटोच्या रोपाच्या मातीचा वरचा थर कोरडा वाटल्यानंतर पाणी द्या. माती ओलसर, पण रोपामध्ये जास्त पाणी साचू देऊ नका, नाहीतर मुळं कुजतात.
Growing Tomatoes at Home
Sakal
रोप जरा एक-दीड फुट उंच झाल्यानंतर मात्र त्याला काठीचा किंवा कशाचा तरी आधार द्या, ज्यामुळे ते रोप टोमॅटोच्या वजनाने वाकणार नाही.
Growing Tomatoes at Home
Sakal
टोमॅटोला कॅल्शियमची गरज लागत असल्याने अंड्याच्या टरफलांचा चुरा किंवा १-२ खडूचे तुकडे मातीत मिसळा. महिन्यातून दोनदा १ मूठ वर्मीकंपोस्ट किंवा केळीच्या सालींचे पाणी द्या.
Growing Tomatoes at Home
Sakal
झाडाची सुकलेली पानं आणि अनावश्यक छोटे फुटवे (Suckers) काढून टाका. तसेच कीड नियंत्रणात ठेवा.
Growing Tomatoes at Home
Sakal
Nag Champa vs Son Champa
Sakal