कुंडीत हळद लावायची? सोपी पद्धत जाणून घ्या

Pranali Kodre

हळद (Turmeric)

हळद घरच्या घरी कुंड्यांमध्ये किंवा बागेत किंवा बाल्कनीत हळद उगवणे अतिशय सोपे आहे.

Growing Turmeric at Home

|

Sakal

हळकुंडाची निवड

बाजारातून किंवा नर्सरीतून मोठे डोळे (मोड)(Sporots)असलेले ताजे हळकुंड निवडता, कारण ते लवकर रुजतात.

Growing Turmeric at Home

|

Sakal

कुंडी (Pot)

हळदीसाठी १२ ते १५ इंच खोल व रुंद कुंडी किंवा ग्रो बॅग निवडा, त्याला खाली पाण्याच्या निचऱ्यासाठी छिद्र असेल याची काळजी घ्या.

Growing Turmeric at Home

|

Sakal

मातीचे मिश्रण (Soil)

५०% बागेतील माती + ३०% वर्मीकंपोस्ट (किंवा शेणखत) + २०% वाळू किंवा नारळाचा भुसा (कोकोपीट)असे मातीचे मिश्रण ठेवा.

Growing Turmeric at Home

|

Sakal

पेरणी (Planting)

मोड आलेला भाग वरच्या बाजूला ठेवून हळकुंड २ -३ इंच खोल मातीत पुरा. एका कुंडीत २-३ हळकुंडं अंतरावर लावू शकता.

Growing Turmeric at Home

|

Sakal

पाणी (Watering)

पुरलेल्या हळकुंडावर वर माती टाकून हलके पाणी द्या. त्यानंतर मातीतील ओलावा पाहूनच पाणी द्या. जास्त पाणी दिल्यास हळकुंडाचे गड्डे कुजण्याची शक्यता असते.

Growing Turmeric at Home

|

Sakal

सूर्यप्रकाश (Sunlight)

हळदीला रोज ५ ते ६ तास चांगल्या सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे कुंडी अशाच ठिकाणी ठेवा जिथे चांगला सूर्यप्रकाश येतो.

Growing Turmeric at Home

|

Sakal

खत

हळदीच्या झाडाला महिन्यातून एकदा मूठभर शेणखत किंवा वर्मीकंपोस्ट द्या.

Growing Turmeric at Home

|

Sakal

रोप

साधारण ३ आठवड्यात हळदीची पानं मातीतून वर येऊ लागतात.

Growing Turmeric at Home

|

Sakal

८ ते ९ महिन्याचा काळ

हळद तयार होण्यासाठी ८ ते ९ महिने साधारण लागतात. पानं पिवळी पडून वाळायला लागली की समजावे हळद काढणीसाठी तयार आहे.

Growing Turmeric at Home

|

Sakal

वापरासाठी हळद तयार

झाड मुळासकट उपटून ताजी हळद स्वच्छ धुवून वापरू शकता.

Growing Turmeric at Home

|

Sakal

उत्तम काळ

हळद लावण्यासाठी उन्हाळ्याचा शेवट किंवा पावसाळ्याची सुरुवात हा काळ उत्तम मानला जातो.

Growing Turmeric at Home

|

Sakal

पानांचाही वापर

हळद हा भारतीय स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक असून याच्या झाडाच्या पानांचाही पदार्थ वाफवण्यासाठी आणि पदार्थांना सुगंध देण्यासाठी वापर होतो. उदा. पातोळ्यांसाठी हळदीची पानं वापरली जातात.

Growing Turmeric at Home

|

Sakal

झाडं स्वत:चं अन्न कसं तयार करतात?

How Do Plants Make Their Own Food?

|

Sakal

येथे क्लिक करा