भेगाळलेल्या पायांचा त्रास होईल गायब; स्वस्तात मस्त उपायांनी मिळवा मऊ टाचा!

Aarti Badade

कोमट पाण्याचा फूट सोक

टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शॅम्पू किंवा एप्सम सॉल्ट टाका आणि १५ ते २० मिनिटे त्यात पाय बुडवून ठेवा.

heal cracked heels remedies

|

Sakal

मृत त्वचा काढून टाकणे

पाण्यात पाय मऊ झाल्यानंतर प्युमिस स्टोन किंवा फूट स्क्रबरने टाचा हळुवार घासून पायांवरील मृत त्वचा काढून टाकावी.

heal cracked heels remedies

|

Sakal

खोबरेल तेलाचा चमत्कार

रात्री झोपण्यापूर्वी पायांना खोबरेल तेल लावून हलका मसाज करावा, ज्यामुळे टाचांचे मॉइश्चरायझिंग होऊन भेगा वेगाने भरून निघतात.

heal cracked heels remedies

|

sakal

सुती मोज्यांचा (सॉक्स) वापर

पायांना तेल किंवा क्रीम लावल्यानंतर ओलावा टिकून राहण्यासाठी रात्री आवर्जून सुती (कॉटन) मोजे घालून झोपावे.

heal cracked heels remedies

|

Sakal

ग्लिसरिन आणि गुलाबपाणी

समप्रमाणात ग्लिसरिन आणि गुलाबपाणी एकत्र करून रोज रात्री तळपायांना लावल्याने त्वचा कोरडी पडत नाही आणि मऊ राहते.

heal cracked heels remedies

|

Sakal

कोरफडीचा (अलोवेरा) लेप

ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये थोडी पिठीसाखर आणि खोबरेल तेल मिसळून पायांना लावल्यास टाचांना नैसर्गिक थंडावा आणि पोषण मिळते.

heal cracked heels remedies

|

Sakal

पेट्रोलियम जेली आणि लिंबू

एक चमचा व्हॅसलीनमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून लावल्यास लिंबू मृत त्वचा काढतो आणि व्हॅसलीन टाचा मऊ करते.

heal cracked heels remedies

|

Sakal

डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

घरगुती उपाय फायदेशीर असले तरी टाचांच्या भेगांमधून रक्त येत असल्यास किंवा जास्त वेदना होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

heal cracked heels remedies

|

Sakal

डायबिटीज असणाऱ्यांनी रवा खाण्याआधी 'हे' नक्की वाचा!

semolina rava good for diabetics

|

Sakal

येथे क्लिक करा