Aarti Badade
पक्षी जमिनीवर बराच वेळ बसलेला, डोळे मिटलेले, उडता न येणे, पिसे विस्कटलेली, पंख किंवा पाय मोडलेला — ही लक्षणे त्याच्या आजारी किंवा जखमी असण्याची शक्यता दर्शवतात.
जर पक्षी जवळ गेल्यावरही उडत नसेल, तर तो एखाद्या आघातामुळे 'शॉक'मध्ये असण्याची शक्यता असते.
अशा पक्ष्याला हळूवार उचलून पुठ्ठ्याच्या पेटीत ठेवा. झाकण्यासाठी झाकण किंवा कपडा वापरा.
पेटीच्या कडेला लहान लहान भोके पाडा, जेणेकरून पक्ष्याला श्वास घेता येईल.
शॉकमध्ये असलेला पक्षी फार संवेदनशील असतो. त्याला जबरदस्तीने अन्न वा पाणी देऊ नये.
पक्षी सुधारतोय का हे पाहण्यासाठी पेटीचं झाकण हळूच उघडा. त्याला थोडा वेळ उघड्यावर ठेवा.
थोड्या जखमा किंवा शॉकमधून काही पक्षी स्वतःच पूर्ववत होऊन उडून जातात.
पक्षी काही वेळानंतरही उडत नसेल, तर तात्काळ पशुवैद्य किंवा वन्यपशू बचाव संस्थेशी संपर्क साधा.
पुण्यातील 'ResQ' संस्था (https://www.resqct.org) अशा जखमी पक्ष्यांसाठी कार्य करते. अग्निशमन दल व वनखाते यांची मदतही आवश्यक वेळी घेता येते.
जखमी पक्ष्याला मदत करताना काळजीपूर्वक व शांतपणे वागा. निसर्गाशी सुसंवाद ठेवून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा.