संगीतोपचार: मनाला आणि शरीराला नवसंजीवनी देणारी थेरपी!

Aarti Badade

संगीतोपचार म्हणजे काय?

संगीतोपचार (Music Therapy) ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे, जी मानसिक, भावनिक आणि संज्ञानात्मक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते.

music therapy | Sakal

संवाद नसला तरी उपचार शक्य!

हा उपचार वैयक्तिक संभाषणावर आधारित नसतो. त्यामुळे डिमेंशिया, अपंगत्व, न्यूरोलॉजिकल समस्या असलेल्या रुग्णांसाठी तो खूप उपयुक्त आहे.

music therapy | Sakal

तोंडी संवाद अशक्य? संगीतोपचार शक्य!

ज्यांना बोलता येत नाही किंवा संवाद साधता येत नाही, अशा रुग्णांसाठी संगीतोपचार इतर थेरपींपेक्षा अधिक परिणामकारक ठरतो.

music therapy | Sakal

घरबसल्या उपचार

अंथरुणावर खिळलेले किंवा थेरपिस्टकडे जाऊ न शकणारे रुग्ण घरी बसून संगीतोपचार घेऊ शकतात.

music therapy | Sakal

मुलांसाठीही फायदेशीर

लहान मुलांना घरच्या वातावरणात ही थेरपी मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि थेरपी अधिक प्रभावी ठरते.

music therapy | Sakal

छंद म्हणूनही उपयुक्त

संगीत किंवा वाद्य शिकणे ही केवळ थेरपी नाही, तर एक सकारात्मक छंदही ठरू शकतो.

music therapy | Sakal

मानसिक आरोग्यासाठी संरक्षणात्मक साधन

संगीतोपचार मानसिक ताण दूर करण्यास मदत करतो आणि कठीण प्रसंगात मानसिक बळ देतो.

music therapy | Sakal

मेंदूच्या कौशल्यांना चालना

संगीत शिकल्याने स्मरणशक्ती, गणित, समन्वय आणि आकलन क्षमता वाढते.

music therapy | Sakal

जबाबदारी व चिकाटीची जाणीव

नियमित सरावामुळे व्यक्तिमत्त्वात अचूकता, चिकाटी आणि जबाबदारी येते.

music therapy | Sakal

सर्जनशीलतेचा आत्मसन्मान

संगीताचा एक तुकडा तयार केल्यावर मिळणाऱ्या आनंदामुळे आत्मसन्मान आणि सकारात्मक मनःस्थिती निर्माण होते.

music therapy | Sakal

मधुमेहाच्या रुग्णांनो! डोळ्यांच्या 'या' आजारांकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते धोक्याचे!

Diabetes and Eye Health | Sakal
येथे क्लिक करा