सकाळ डिजिटल टीम
वरवर सुंदर दिसणारी ही फळे नागरिकांच्या आरोग्यासाठी जीवघेणी ठरू शकतात. नफ्यासाठी व्यापारी कॅल्शियम कार्बाइडसारखी रसायने वापरतात.
Banana
रसायनाच्या पुड्या कच्च्या केळींच्या घडांमध्ये ठेवल्या जातात, ज्यामुळे उष्णता निर्माण होऊन फळे रातोरात पिकतात आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत पिवळीधमक दिसतात.
Banana
घातक रसयान वापरलेल्या केळीच्या सेवनामुळे पोटाचे विकार, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ आणि दीर्घकाळ सेवनाने मज्जासंस्था खराब होण्याचा तसेच आतड्यांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
Banana
कृत्रिमरीत्या पिकवलेल्या केळींचा रंग पूर्णपणे पिवळाधमक असतो; मात्र त्यांचे देठ गडद हिरवेच राहते.
Banana
रसायन वापरून पिकवलेली केळी पूर्णपणे डागविरहित, अत्यंत गुळगुळीत आणि ‘लेमन यलो’ रंगाची दिसतात. त्यावर नैसर्गिक प्रक्रियेचे कोणतेही डाग नसतात.
Banana
कृत्रिमरीत्या रसायनात ठेवली गेल्याने घडातील सर्वच्या सर्व केळी अगदी एकाचवेळी आणि एकसमान पिवळी होतात.
Banana
ही केळी बाहेरून पिकलेली दिसत असली, तरी आतून ती कडक किंवा कच्ची असू शकतात आणि त्यांची चव बेचव किंवा तुरट लागते.
Banana
रसायनांनी पिकविलेली केळी घरी आणल्यानंतर अवघ्या एक ते दोन दिवसांतच काळी पडतात आणि आतून सडायला सुरवात होते.
Banana
Cyclone
ESakal