खराब आंबा कसा ओळखाल? ‘या’ 2 सोप्या ट्रिक्सने फसवणूक टाळा!

Aarti Badade

आंब्यांचा सिझन आणि तुमची निवड!

उन्हाळ्यात बाजारात हापूस आंब्यांची मोठी आवक होते. पण अनेकदा बाहेरून पिवळाधमक दिसणारा आंबा कापल्यावर आतून खराब निघतो.

identify bad mango

|

Sakal

आंबा खरेदी करताना आकार पाहा

तज्ज्ञांच्या मते, हापूस आंबा खरेदी करताना त्याचा आकार सर्वात महत्त्वाचा असतो. उभट आकाराचे आंबे सहसा आतून चांगले असतात.

identify bad mango

|

Sakal

गोलाकार आंब्यांपासून सावध!

जर हापूस आंब्याचा आकार पूर्णपणे गोलाकार असेल, तर असा आंबा बाहेरून टवटवीत दिसला तरी आतून खराब निघण्याची शक्यता जास्त असते.

identify bad mango

|

Sakal

देठाकडील भागाची तपासणी

आंबा फिरवून त्याच्या देठाकडचा भाग नीट तपासा. जर देठाच्या जागी खोल खड्डा दिसत असेल, तर तो आंबा आतून सडलेला असू शकतो.

identify bad mango

|

Sakal

चांगल्या आंब्याचा देठ कसा असतो?

अस्सल आणि चांगल्या हापूसच्या देठाकडचा भाग हा किंचित खोलगट पण सरळ रेषेत दिसणारा असतो. खरेदी करताना ही बारीक गोष्ट नक्की तपासा.

identify bad mango

|

Sakal

काळे डाग आणि चट्टे तपासा

काहीवेळा झाडावरून काढताना आंबे खाली पडतात. अशा मार लागलेल्या आंब्यांवर काळे डाग पडतात आणि ते पिकताना आतून खराब होतात.

identify bad mango

|

Sakal

फसवणूक टाळा

केवळ रंगावर न जाता, या २ सोप्या ट्रिक्स (आकार आणि देठ) वापरून तुम्ही नेहमी उत्कृष्ट दर्जाचा आणि गोड आंबा निवडू शकता.

identify bad mango

|

Sakal

उन्हाळ्यात त्वचा ड्राय होतेय? ‘हे’ उपाय करा; त्वचा राहील मऊ अन् टवटवीत!

Summer Skin Care

|

Sakal

येथे क्लिक करा