उन्हाळ्यात त्वचा ड्राय होतेय? ‘हे’ उपाय करा; त्वचा राहील मऊ अन् टवटवीत!

Aarti Badade

वाढत्या उन्हाचा त्वचेवर परिणाम

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे आणि प्रचंड घाम येणे अशा समस्या जाणवू लागतात.

Summer Skin Care

|

Sakal

फेस वॉश

उन्हाळ्यात चेहरा स्वच्छ ठेवणे गरजेचे असले तरी, दिवसातून केवळ दोनच वेळा जेंटल फेस वॉशने चेहरा धुवावा. वारंवार फेस वॉश वापरल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.

Summer Skin Care

|

Sakal

साध्या पाण्याचा वापर करा

जर तुम्हाला वारंवार घाम येत असेल आणि चेहरा धुवावासा वाटत असेल, तर फेस वॉशऐवजी फक्त साध्या पाण्याने चेहरा धुवा. जास्त प्रमाणात एक्सफोलिएटिंग फेस वॉश वापरणे टाळावे.

Summer Skin Care

|

Sakal

मॉइश्चरायझर लावणे आवश्यक

चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर जेंटल मॉइश्चरायझर नक्की लावा. उन्हाळ्यासाठी प्रामुख्याने 'ऑईल कंट्रोल' (Oil Control) मॉइश्चरायझर निवडल्यास त्वचा चिकट न होता हायड्रेटेड राहते.

Summer Skin Care

|

Sakal

सनस्क्रीन

सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही घरात असा किंवा बाहेर, दर तीन तासांनी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे अत्यंत गरजेचे आहे.

Summer Skin Care

|

Sakal

सनस्क्रीनची योग्य निवड

ज्यांची त्वचा तेलकट आहे किंवा ज्यांना जास्त घाम येतो, त्यांनी 'जेल बेस' (Jel Base) किंवा 'वॉटरप्रूफ' सनस्क्रीन वापरावे. यामुळे उन्हातही त्वचेचे संरक्षण व्यवस्थित होते.

Summer Skin Care

|

Sakal

शरीर हायड्रेटेड ठेवा

त्वचेला बाहेरून सांभाळण्यासोबतच आतून हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. आहारात फळे आणि फळांच्या रसाचा समावेश केल्यास तुमची त्वचा नैसर्गिकरित्या ताजी आणि टवटवीत दिसेल.

Summer Skin Care

|

Sakal

Summer skin care tips

|

Sakal

येथे क्लिक करा