बाहेरून पिवळे धमक, पण आतून खराब आंबे! न कापता कसे ओळखायचे? पाहा सोपी ट्रिक

Saisimran Ghashi

आंब्यांचा सीझन

उन्हाळा येताच आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे.

mango season best alphonso

|

esakal

पिवळे धमक आंबे

आंबे खरेदी करताना ते बाहेरून चांगले चकचकीत दिसतात, पण आत खराब असू शकतात

Tips to Buy Sweet and Juicy Mangoes

|

esakal

खराब आंबे

बाहेरून पिवळे पण आतून खराब असलेले आंबे न कापता ओळखण्यासाठी ५ सोप्या टिप्स फॉलो करा

5 Easy Ways to Check Mango Quality from Outside

|

esakal

फळाचा स्पर्श

आंबा हातात घेऊन हलके दाबून पाहिल्यास तो सर्व बाजूंनी सारखा मऊ असावा, मात्र खूप जास्त पिलपिलीत किंवा एखादाच भाग मऊ असल्यास तो आतून खराब असू शकतो.

Touch Test: Spot Soft or Overripe Mangoes

|

esakal

आंब्याचे देठ

आंब्याच्या देठाजवळचा भाग हुंगून पाहिल्यास जर गोड आणि नैसर्गिक सुवास आला तर आंबा चांगला समजावा, परंतु आंबट किंवा अल्कोहोलसारखा वास आल्यास तो आंबा सडलेला असू शकतो.

Smell Test: Natural Fragrance vs Bad Odour in Mangoes

|

esakal

आंब्याची साल

आंब्याची साल एकदम गुळगुळीत आणि डागविरहित असावी; जर सालीवर काळे डाग, पांढरे ठिपके किंवा सुरकुत्या असतील तर तो आंबा जुना किंवा खराब झालेला असतो.

Skin Inspection: Signs of Bad or Old Mangoes

|

esakal

वजनाचा अंदाज

चांगल्या आणि रसाळ आंब्याचे वजन त्याच्या आकाराच्या तुलनेत हाताला जड लागते, याउलट आंबा वजनाला हलका लागल्यास तो आतून सुकलेला किंवा खराब असण्याची शक्यता असते.

Weight Check: Heavy vs Light Mangoes

|

esakal

पाण्याची चाचणी

आंबा एका पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकल्यावर जर तो तळाला बसला तर तो चांगला असतो आणि जर तो पाण्यावर तरंगला तर तो आंबा आतून पोकळ किंवा खराब असू शकतो.

Water Test: Float or Sink Method for Mango Freshness

|

esakal

पावडरने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? पाहा एकदम सोपी ट्रिक

esakal

येथे क्लिक करा