Aarti Badade
उन्हाळ्यात कलिंगड खूप फायदेशीर असतं, पण भेसळ केलेल्या कलिंगडापासून सावध राहा.
कलिंगडला एरिथ्रोसिनसारखं लाल रसायन टोचून रंग गडद केला जातो.
जमिनीत वाढलेल्यया कालिंगडावर पिवळे डाग असतात ते सेंद्रिय कलिंगड ओळखण्याचं लक्षण आहे.
टरबूज कापल्यावर त्याच्या आतील भागात जर मोठ्या भेगा दिसल्या, तर ते भेसळ केलेलं असू शकतं.
कापलेल्या कलिंगडावर थोडासा कापूस लावा. कापूस लगेचच लाल झाला, तर कलिंगड भेसळयुक्त आहे.
कलिंगडाचा रंग अत्यंत गडद लाल दिसत असेल, तर ते कृत्रिम रंग वापरून तयार केलेलं असण्याची शक्यता असते.
सेंद्रिय कलिंगडाला हलकासा गोडसर वास आणि नैसर्गिक चव असते. भेसळयुक्त फळाला चवही कृत्रिम लागते.