Aarti Badade
आंब्याची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.
आंब्याची साल बारीक करून घ्या, त्यात कॉफी पावडर घाला आणि या मिश्रणाने त्वचा स्क्रब करा.
त्वचा मॉइश्चरायझ होण्यासाठी मिश्रणात खोबरेल तेलाचे थोडे थेंब घालून आंब्याच्या सालीच्या मिश्रणात मिक्स करा.
टॅनिंग कमी करायचं असल्यास, आंब्याची साल आणि दही मिसळून 10-15 मिनिटे चेहऱ्यावर लावा.
आंब्याच्या सालीमध्ये मधाचे थेंब टाकून चेहऱ्यावर चोळा, त्यामुळे डाग कमी होतात.
आंब्याची साल लावल्यानंतर चेहऱ्यावर साबण किंवा फेसवॉश वापरू नका.
आंब्याची साल त्वचेला पोषण देत, डाग, टॅनिंग आणि इतर त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवते.
आंब्याची साल त्वचेच्या देखभालीसाठी एक नैसर्गिक उपाय आहे, ज्याचा वापर करून तुम्ही सुदृढ आणि चमकदार त्वचा मिळवू शकता. परंतु कोणताही उपाय ट्राय करण्याआधी हातावर किंवा चेहऱ्यावर, मानेवर पॅच टेस्ट करून बघा.